PM Internship Scheme तरुणांना मिळणार प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये |

PM Internship Scheme

PM Internship Scheme केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. देशातील युवकांसाठी केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे.

देशातील 500 नामांकित कंपन्यांमध्ये 21-24 वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.

10 वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्या तरुणांसाठी केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना(PM Internship Scheme) सुरू केली आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

PM Internship Scheme तरुणांना मिळणार 5000 रुपये स्टायपेंड:

ज्या तरुणांचे या योजनेअंतर्गत निवड होणार आहे अशा तरुणांना कंपनी व केंद्र सरकार कडून भत्ता मिळणार आहे. प्रत्येक इंटर्नला केंद्र सरकारकडून इंटर्नशिप च्या वेळी प्रत्येक महिन्याला 4500 रुपये स्टायपेंड देण्यात येईल.

हे वाचले का?  Annasaheb Patil Mahamandal Loan आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ..

संबंधित कंपनी कडून अतिरिक्त 500 रुपये स्टायपेंड देण्यात येईल. ज्यावेळी एक वर्षाच्या इंटर्नशिप नंतर प्रमाणपत्र मिळेल तसेच ज्या कंपनी मध्ये रिक्त जागा असेल तिथे तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल.

PM Internship Scheme अर्ज कुठे करावा?

पीएम इंटर्नशिप योजने अंतर्गत ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे अशा उमेदवारांना 12 ऑक्टोबर पासून अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवार pminternship.mci.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करता येईल.

उमेदवारांना 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येतील. इंटर्नशिप चालू असताना उमेदवारांना काही अडचण आल्यास 1800-116-090 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

कोण पात्र असेल?

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

उमेदवाराचे वय हे 21 ते 24 वर्ष दरम्यान असावे.

हे वाचले का?  Best Saving Schemes या आहेत बचतीसाठी सर्वोत्तम योजना | मिळते आकर्षक व्याज |

औपचारिक पदवी किंवा नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

ही असेल पात्रता:

ITI, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा BA, B.Sc., B.Com, BCA, BBA, B. फार्मा केलेले 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतील. आयआयटी, आयआयएम, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएसईआर, एनआयटी आणि ट्रिपल आयटी यांसारख्या संस्थांमधून पदवी प्राप्त केलेले तरुण अर्ज करू शकणार नाहीत.

ज्यांच्याकडे CA, CS, MBBS, BDS, MBA किंवा इतर व्यावसायिक पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक आहे त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.

तरुणांना मिळणार दरमहा ८ ते १० हजार रुपये | पहा काय आहे योजना | ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

हे वाचले का?  One Farmer One Transformer scheme एक शेतकरी एक डीपी योजना...

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा     

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top