OBC Students Hostel Scholarship | OBC विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

OBC Students Hostel Scholarship

OBC Students Hostel Scholarship ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ” साठी निकष व अटी लागू करणेबाबत शासननिर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण पहाणार आहोत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन निर्णय :-

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे मटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यासाठी निकष व इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करतील, सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/ मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संलग्न (attach) करतील.

OBC Students Hostel Scholarship विद्यार्थी पात्रता

  • विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा,
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
  • अनाम प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
  • दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्याथ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
  • विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बैंक खात्याशी संलग्न करणे बंधनकारकराहील.
  • विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा
हे वाचले का?  Caste Validity Certificate SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्याची मुदत

शैक्षणिक निकष OBC Students Hostel Scholarship

१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्याथ्यर्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPAचे गुण असणे आवश्यक राहील.

३. व्यावसायिक तसेब बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.

४. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व

३०% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.

५. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लामास पात्र राहील.

६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किया तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा.

७. एका शाखेची पदवी किया पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

८. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यांस देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.

९. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

इतर निकष OBC Students Hostel Scholarship

१. योजनेचा लाभ १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु, इंजीनिअरिंग / वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्ष अनुज्ञेय असेल.

२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.

३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल.

हे वाचले का?  Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये भाडे मिळणार, पडीक जमिनीसाठी!!!

४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.

५. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि, उपरोक्त ५ वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.

६. सदर योजनेतंर्गत सन २०२४-२५ करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थी अशा रितीने प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल. तद्नंतर सन २०२५-२६ पासून व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहिल. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांस पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. उर्वरीत सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे शासन परिपत्रक क्र. यगृयो-२०२३/प्र.क्र.१२/योजना-५, दि.१३.०३.२०२३ मधील विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल.

७. विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, ज्या विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल.

८. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किवा व्यवसाय करत नसावा.

९. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांन शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी / व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.

१०. सदर योजनेतंर्गत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे.

image

११. योजनेतंर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४% समांतर आरक्षण किया शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा ५०% इतकी राहील, व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

हे वाचले का?  Schemes for Women महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना |

१२. सदर योजनेतंर्गत महिलांसाठी ३०% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
  • स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत)
  • कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
  • भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र / करारनामा
  • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा

OBC Students Hostel Scholarship अनुदान वितरण:-

सदर योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे अनुदान वितरण करण्यात यावे -:

योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेली भोजन, निवास व निर्वाहभत्त्याची पात्र लाभाथ्यर्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्या-मधून आगाऊ जमा करण्यात यावी. सदरहू योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्त्यात नमूद प्रमाणे वेळापत्रक ठरविण्यात येत आहे-

image 1

तक्यात नमुद वेळापत्रक हे जरी १२ महिन्यांचा कालावधी दर्शवित असले तरी प्रस्तूत योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यास एका शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांचा कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील. सदर १० महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांची राहील. तथापि, लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये देय असलेली रक्कम जमा करावी.

  • अनुज्ञेय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बैंक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.
  • या योजनेत लानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस इतर कोणताही भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाहीस उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

सदर योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात यावी.

image 2

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा:

शासन निर्णय (01 )

शासन निर्णय(02)

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top