PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत

नवीन अर्जदारांनी पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करणेबाबतची खालीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित करण्यात येत आहे:-

१) अर्जदारांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करावी अथवा तालुका कृषि अधिका-यांमार्फत अथवा सामुहिक सुविधा केंद्रा (CSC) मार्फत पोर्टलवर नोंदणी करावी. (सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रांसह)

२) पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या / तालुका स्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदारांची माहिती जमीनधारणेच्या अनुषंगाने पडताळणी करणेसाठी तहसिलदार यांना तालुका कृषि अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करुन देतील.

३) तहसिलदार यांनी नोंदणीकृत अर्जदार यांचे भूमी अभिलेखाशी संबंधित कागदपत्रांच्या (७/१२, ८अ, नोंदीचा फेरफार इ. कागदपत्रे) आधारे खातरजमा करून नोंदणीकृत शेतकरी भूमी अभिलेख नोंदीनुसार योजनेसाठी पात्र / अपात्र असल्याचे पोर्टलवर प्रमाणित करुन देतील.

४) भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याची कार्यवाही महसुल विभागामार्फत केली जाईल व त्या आधारे पुढील कार्यवाही कृषि विभागामार्फत केली जाईल.

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

५) तालुका / जिल्हा कृषि अधिकारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थी योजनेच्या इतर निकषांप्रमाणे पात्र असल्याची खातरजमा करतील.

६) तहसिलदार यांनी नोंदविलेले अभिप्राय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडील माहिती आधारे तालुका कृषि अधिकारी नोंदणीकृत शेतकरी हे पात्र असल्यास त्यांना मान्यता प्रदान करतील

तसेच अपात्र किंवा इतर कारणांने नाकारावयाचे असल्यास मान्यता नाकारण्याचे कारण देऊन पोर्टलवर मान्यता नाकारतील. 

७) तालुकास्तरावर मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्याची यादी जिल्ह्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध झाल्यावर जिल्ह्यास्तरावरुन मान्यता प्रदान करणे / नाकारणे बाबतची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल.

जिल्हास्तरावरून मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थीची माहिती आयुक्त (कृषि) यांच्या स्तरावर राज्यस्तरावरील लॉगीनमध्ये उपलब्ध झाल्यावर राज्यस्तरावरून मान्यतेची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top