PM Kusum Solar Scheme शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!

PM Kusum Solar Scheme

PM Kusum Solar Scheme केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना सुरू केलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येतात. यासाठी महा ऊर्जा ने पुन्हा अर्ज सुरू केलेले आहेत आणि याची मुदत ही संपलेली नाहीत. परंतु मुदत संपेल या भीतीने वेबसाईट वरती अनेक शेतकऱ्यांकडून एकाच वेळी अर्ज केले जात आहेत. यामुळे वेबसाईट बंद पडत आहे.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये भाडे मिळणार, पडीक जमिनीसाठी!!!

PM Kusum Solar Scheme मात्र सौर कृषी पंपासाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत नसल्याने शेतकऱ्यांनी घाई करू नये आणि सावकाश अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे. प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून आतापर्यंत 28 हजार 601 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. महाऊर्जाच्या वेबसाईट च्या काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. यामुळे वेबसाईट वरती तांत्रिक अडचणी येऊन तांत्रिक भार पडत असल्यामुळे ते बंद पडत आहे, अशा तक्रारी येत आहेत.

हे वाचले का?  MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची 'आवडेल तिथे प्रवास योजना'!!!

ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!

यामुळे याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेसाठी केव्हाही अर्ज करता येऊ शकतो. वेबसाईट बंद होणार नसून शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज भरण्यास कालावधी उपलब्ध आहे. अर्ज करणारे शेतकऱ्यांची संख्या मर्यादित असल्यास ही अडचण येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, असे महासंचालक यांनी स्पष्ट केले आहे.

Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?

  • प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना 90 व 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपाचे वाटप केले जात आहे.
  • पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी एक लाख सौर कृषी पंपांचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.
  • प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना ही सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत आतापर्यंत 58 हजार पंप शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आलेले आहेत.
  • महा ऊर्जा ने पूर्वीच्या अर्जासह नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 17 मे पासून वेबसाईट सुरू केली आहे.
  • पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 2729 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
  • त्या पाठोपाठ नगर जिल्ह्यातून १७८७ अर्ज तर सांगली जिल्ह्यातून 1864 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
हे वाचले का?  Krishi Yantrikaran Yojana कृषी यांत्रिकीकरण योजना…. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे……..!!!!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  "तौक्ते" चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत जाहीर

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top