Post Office Scheme For Senior Citizen भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये फक्त पात्र व्यवहार च केले जात नाही, तर आपण आता पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक देखील करू शकतो. पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक दीर्घकालीन बचत मार्ग आहे. यामुळे त्यांना वृद्धापकाळात सुरक्षितता मिळू शकते.
ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि त्यांचे निवृत्तिनंतरचे दिवस आर्थिकदृष्ट्या चांगले जावे यासाठी ही एक चांगली योजना आहे.
पोस्ट ऑफिस कडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. यातील एक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. जाणून घेऊया काय आहे योजना, आवश्यक कागदपत्रे, पात्रता काय आहे. लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
Post Office Scheme For Senior Citizen काय आहे योजना:
६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक बचत योजना आहे. जे सरकारी कर्मचारी ५५ वर्षांनंतर निवृत्त होतात असे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना ५० वर्षानंतर या योजनेचा लाभ घेत येतो. पोस्ट ऑफिस मधील बचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सर्वाधिक व्याजदर आहे. या योजनेद्वारे मिळणारा व्याजदर हा ८.२ टक्के आहे.
जे ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात ते कमीत कमी १ लाख रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपये या योजने मध्ये गुंतवू शकतात. दर ३ महिन्यांनी बचत खात्यात व्याज जमा केले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता:
- 60 वर्षे किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या व्यक्तीचे वय 55 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- तसेच ज्या व्यक्तीचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे ती व्यक्ती निवृत्त संरक्षण कर्मचारी खाते उघडू शकते.
आवश्यक कागदपत्रे:
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट
- ज्येष्ठ नागरिक कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
जर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या या योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल आणि एक वर्षाच्या या योजनेमधून बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
पहिले ३ महिन्याचे व्याज जमा झाले असेल तर तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेतून ते वजा केले जाते.
ज्यावेळी गुंतवणूकदार एक वर्षानंतर आणि २ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी रक्कम काढत असेल तर एकूण रकमे पैकी १.५ टक्के रक्कम कपात केली जाते. त्यानंतर जर खाते बंद केले तर १ टक्का रक्कम कापली जाते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.