Divyang Scheme दिव्यांग व्यक्तींना मिळणार ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ | असा करा अर्ज |

Divyang Scheme

Divyang Scheme राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

१. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा.

३. अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

४. अर्जदार दि.०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा

५. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील

हे वाचले का?  Adiwasi Vikas Yojana आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

६ . दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.

७. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अति तीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.

८. अति तीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अति तीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.

९. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.

१०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे .

हे वाचले का?  दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर | मिळणार प्रति लिटर 5 रु अनुदान |

११. जिल्हा निहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.

१२. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.

१३. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा.

Divyang Scheme आवश्यक कागदपत्रे:

१) अर्जदाराचा फोटो

२) अर्जदाराची सही

३) जातीचा दाखला

४) अधिवास प्रमाणपत्र

५) निवासी पुरावा

६) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र

(७) UDID प्रमाणपत्र

८) ओळखपत्र

९) बँक पासबुकचे पहिले पान

१०) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्याने या सूचना वाचणे आवश्यक आहे.

प्रथमच वापरकर्त्याने नोंदणी/लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास साइन-अप/साइन-इन पृष्ठावर निर्देशित केले जाईल.

हे वाचले का?  Ladaki Bahin Yojana राज्यातील महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

ओटीपी पाठवा बटणावर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top