Property Ownership या गोष्टींमुळे जमिनीच्या मालकी हक्कात होतात बदल |

Property Ownership

Property Ownership जमिनीच्या मालकी हक्कात बदल होण्यामागे अनेक कारणे असतात. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या नावावरील जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केली जाते, यालाच जमिनीच्या मालकी हक्कात बदल होणे असे म्हणतात. साधारणपणे वारस नोंदीमुळे मालकी हक्कात बदल असा समाज, परंतु इतर पण अशी काही कारणे आहेत की ज्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.

Property Ownership या गोष्टीमुळे जमिनीच्या मालकी हक्कात बदल

1.खरेदी विक्री:

एखाद्या जमिनीचा व्यवहार म्हणजेच खरेदी विक्री झाली तर त्याचे खरेदीखत बनवले जाते. जमिनीच्या मालकी हक्काचा खरेदी खत हा प्रथम पुरावा आहे.

जमिनीचा व्यवहार कोणत्या व्यक्तींमध्ये जल, खरेदीची तारीख काय होती, व्यवहार किती क्षेत्रावर झाला, आणि जमिनीची खरेदी किंमत ही सर्व माहिती खरेदी खतावर असते. त्यानंतर तलाठी फेरफार घेतात.

हे वाचले का?  सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021

फेरफार उतार्‍यामध्ये शेतजमि‍नीवर बोजा लावणे, वारस नोंदी, खरेदी विक्री याची माहिती असते. नंतर फेरफार नोंदीची तपासणी मंडल अधिकार्‍याकडून केली जाते. मंडल अधिकारी हे 25 दिवसाच्या आत मंजूर करतात. यानंतर मग ज्या व्यक्तीने शेतजमीन खरेदी केलेली असते त्याचे नाव सातबारा उताऱ्यावर लागते. जमिनीच्या मालकी हक्कात बदल करणारी ही एक गोष्ट आहे.

सक्षम अधिकार्‍याचा आदेश:

समजा एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे मालकी हक्क मिळवला असेल तर अशा वेळी सक्षम अधिकार्‍याच्या आदेशाने मालकी हक्कात बदल होऊ शकतो.

जर एखाद्या व्यक्तीने दस्त चुकीचा दिल असेल तर त्या विरोधात अपील केले जाते नि त्या नंतर फेरफार मध्ये बदल केला जातो

त्यानंतर हा बदल सातबाऱ्यावर नोंदवला जातो. अशाप्रकारे सक्षम अधिकार्‍याने आदेश दिल्यानंतर मालकी हक्कात बदल होतो.

वारसनोंदी:

जर् एखादी व्यक्ति मृत्यू पावली तर त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्याच्या वारसांची नवे लावली जातात.

परंतु यासाठी वारसांनी 90 दिवसाच्या आत तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…

जर वारस नोंदीसाठी वरसांनी विलंब केला तर कायद्याप्रमाणे दंड आकारला जातो.

वारसांनी केलेल्या अर्जानंतर जुन्या मालकच नाव कमी होऊन त्या ऐवजी नविन मालकाचे नाव लागते.

अशा प्रकारे वारसनोंदी नंतर जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.

भूसंपादन:

एखाद्या कामासाठी जमीन ताब्यात घेणे म्हणजेच भूसंपादन होय. एखादा सरकारी प्रकल्प असेल किंवा काही सार्वजनिक काम असेल तर त्यासाठी जमिनीचे संपादन केले जाते.

ज्या शेतकऱ्याची जमीन संपादित केली जाते त्या शेतकऱ्याला जे काही बाजार मूल्य असेल त्यानुसार मोबदला देण्यात येतो.

भूसंपणदण व पुनर्वसन कायद्यानुसार यामध्ये कारवाई केली जाते आणि मालमत्तेवरील जमिनीच्या मूळ मालक ऐवजी ज्या यंत्रणेने भूसंपादन केले आहे त्या यंत्रणेचे नाव लागते. आणि जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.

न्यायालयीन खटले:

जमिनीचे वाटप हे महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार होते. परंतु यासाठी सहहिस्सेदार यांची संमती आवश्यक असते.

हे वाचले का?  विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी नुकसान ग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई

जर सर्व सहहिस्सेदारांची संमती नसेल तर कलम 85 नुसार तहसीलदारांना जमिनीचे वाटप करता येत नाही.

अशा वेळी अशी प्रकरणे बंद करून संबंधित व्यक्तींनी दिवाणी न्यायालयात दाद मागता येते.

दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या कलाम 54 अंतर्गत जमिनीचे वाटप करून देण्यात येते.

प्रशासकीय यंत्रणेद्वारा जमिनीचे वाटप करून दिल्यानंतर मालकी हक्कात बदल होतो.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top