अशी करा भोगवटादार वर्ग -2 ची जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतरित | अर्ज कसा करावा? भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर |

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर : आज आपण बघणार आहोत की भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग -1 मध्ये रूपांतरित कशी करायची.

लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

वर्ग-1 आणि वर्ग-2 ची जमीन म्हणजे काय?

तुमच्या जमिनीची भूधारणा कोणत्या पद्धतीची आहे त्याची माहिती तुमच्या सातबारा उताऱ्यावर नमूद केलेली असते.

भोगवटादार वर्ग-1: ज्या जमिनींचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, अशा जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये येतात. अशा जमिनींचा मालक हा शेतकरी असतो.

भोगवटादार वर्ग-2: ज्या जमिनींच्या हस्तांतरणावर शासनाचे निर्बंध असतात. अशा जमिनी भोगवटादार वर्ग-2 मध्ये येतात. या जमिनी शासनाकडून मिळालेल्या असल्यामुळे सरकारी अधिकार्‍याच्या परवानगी शिवाय या जमिनींचे हस्तांतरण करता येत नाही.

हे वाचले का?  सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा महाराजस्व अभियान सुरू

भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी, देवस्थान इनाम जमिनी यांचा समावेश यामध्ये होतो.

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर: अर्ज कसा करायचा?

सरकारने 8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्‍या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे) नियम, 2019 प्रसिद्ध केला.

महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार शासनाने ज्या जमिनी रहिवासी, वाणिज्यिक, कृषिक किंवा औद्योगिक वापरासाठी दिलेल्या आहेत त्या जमिनींचे रूपांतर वर्ग 1 मध्ये करता येते.

जर भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करायचे असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे अर्ज करता येतो.

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज नमुना pdf

वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी किती नजराणा द्यावा लागतो?

जे खंडकरी शेतकरी आहे, त्यांच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी कोणताही नजराणा आकारला जाणार नाही, परंतु इतर भूमिहीन शेतकऱ्यांना सरकारने ज्या जमिनी दिल्या आहे त्या वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करताना जो काही दर असेल त्यानुसार नजराणा आकारला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

  • वाणिज्यिक किंवा औद्योगिक कामासाठी भाडे पट्ट्याने किंवा कब्जेहक्काने जमीन धारण केलेली असेल तर चालू वर्षी जमिनीचा जो काही दर असेल त्याच्या बाजारभावाप्रमाणे 50% रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
  • जर कब्जेहक्काने धारण केलेली जमीन रहिवासी वापरासाठी असेल, ते जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाप्रमाणे 15% रक्कम नजराणा म्हणून शासनाला द्यावी लागते.
  • जर भाडे पट्ट्याने धारण केलेली जमीन रहिवासी वापरासाठी असेल, ते जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाप्रमाणे 25% रक्कम नजराणा म्हणून शासनाला द्यावी लागते.
  • प्रदान केलेलि जमीन कृषिक असेल तर् जमिनीचा चालू वर्षाचा जो कही बाजारभाव असेल त्याच्या 50% रक्कम नजराणा म्हणून शासनाला द्यावी लागते.
हे वाचले का?  ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार

आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

  • जमिनीच्या चतु:सीमा दाखवणारा नकाशा
  • एकत्रि‍करणाचा मूळ उतारा
  • विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
  • जमीन मालकाने करायचा विनंती अर्ज
  • आकरबंदची मूळ प्रत
  • मूळ जमीन धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत
  • जमिनीचे 50 वर्षांचे उतारे
  • तलाठी यांच्या कडील वन जमीन नोंद वहीचा उतारा

अशाप्रकारे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करता येते.

शासन निर्णय (1)

शासन निर्णय(2)

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  पुरग्रस्थाना मदत जाहीर 11,500 कोटींची मदत मिळणार

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top