Ration Card Online Maharashtra राज्यातील नागरीकांना नवीन शिधापत्रिकेकरिता अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत Public Login वर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तथापि, सदर Public Login सुविधेचा वापर करताना लाभार्थ्यांना विविध अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
सदर अडचणी दूर करण्याकरिता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) च्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी Module तयार करण्यात आले आहे
Ration Card Online Maharashtra ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढावे?
सर्व नागरीकांनी नवीन शिधापत्रिका / दुय्यम शिधापत्रिका / शिधापत्रिकेत नवीन सदस्य वाढवणे, कमी करण्यासाठी खालील प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा.
https://rcms.mahafood.gov.in Google: वर या संकेत स्थळाला भेट द्यावी.
Sing in/Register/Public login: यावर क्लिक करावे.
नाव अॅड करण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
New user!signup Here: नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी खाते तयार करा.
I Want to apply for New for New Ration card / I have a valid Ration Card & I am a HoF/ HoFN I have a valid Ration Card & I am a Member other than HoF/ HoFN:यावर क्लिक करुन आधार क्रमांक वरील आधारे सर्व माहिती भरून OTP आधारे नवीन खाते तयार करुन घ्यावे.
Registerd user: वरील प्रमाणे Registration पूर्ण झाल्यानंतर यावर क्लिक करावे, क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक अथवा username / Password आधारे लॉगीन करा.
New: वरील प्रमाणे लॉगीन केल्यानंतर Dashboard वरील डाव्या बाजूला New यावर क्लिक करून नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी गावाचे नांव निवडावे.
त्यानंतर कुटुंबातील सदस्य याची माहिती आधार कार्ड वरील माहिती प्रमाणेच भरावी.
यामध्ये दिलेला सर्व तपशील भरावा विहीत ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जन्म तारखेचा पूरावा अपलोड करावा.
या प्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य यांचा समावेश करावा.
Card Type Details: कुटुबातील सर्व सदस्य समावेश झाल्यानंतर रेशन कार्ड ची योजना निवडावी
नाव अॅड करण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
Gas & Kerosene Oil details:. या बाबत सर्व माहिती भरावी.
Attached Enclosures: यामध्ये Identity Proof Address Proof व Other यामध्ये पुरावे जोडावेत व ते नमुद करावे
NFSA Criteria: यामध्ये अर्जदाराचे कुटूंब कोणत्या योजनेखाली येते यावावत माहिती नमुद करावी व ती योजना निवडावी सोचत उत्पन्ना बाबतचा पुरावा जोडावा
FPS Details: या मध्ये अर्जदार हे यांना हवे असलेले रेशन दुकान निवडावे.
Submit Ration Card for verification and approval: या बटनवर क्लिक केल्यातनंतर आपले रेशन कार्ड मंजूरीसाठी तहसिल कार्यालयाकडे प्राप्त होईल.
रेशन कार्ड प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे ऑनलाईन सादर झाल्या नंतर अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपले रेशन कार्ड चे लॉगीन आयडी वापरून अर्जाची स्थिती तपासू शकतात.
रेशन कार्ड मंजूर झाल्या नंतर अर्जदार यांनी प्रधिकृत अधिकारी यांचे डीजीटल स्वाक्षरीचे ई रेशन कार्ड डाऊनलोड करावे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा