Ration Card update 2024 रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी | गौरी गणपती मध्ये मिळणार आनंदाचा शिधा |

Ration Card update 2024

Ration Card update 2024 राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात येणार

सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरीता राज्यात सन २०२२ च्या दिवाळी, सन २०२३ च्या गुढीपाडवा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती उत्सव व दिवाळी, सन २०२४ च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा-छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात आला आहे. सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

हे वाचले का?  जमीन NA करण्याची गरज नाही (Jamin NA karnyachi garaj nahi)

त्याच धर्तीवर सन २०२४ च्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Ration Card update 2024 शासन निर्णय :-

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

Mobile Number Update in Ration Card असा करा रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट |

हे वाचले का?  Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच दि. १५ ऑगस्ट, २०२४ ते दि. १५ सप्टेंबर, २०२४ या १ महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे २ १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. Ration Card update 2024

उपरोक्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याकरीता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी Mahatenders या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांऐवजी ०८ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top