RTE Admission Application RTE ऍडमिशन 2023-2024 लवकरच सुरू.

RTE Admission Application अर्ज केला म्हणजे खात्रीशी प्रवेश मिळेलच का ?

शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. RTE Admission Application

RTE अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

RTE Admission Application या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे –

“टीप RTE 25% ऑनलाईन प्रवेश याकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ची असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही त्याची नोंद घ्यावी “

  1. रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा (सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता) : रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान, ओळखपत्र या सर्व पैकी कोणतेही एक .यापैकी कुठलेही कागदपत्र तुमच्याकडे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

2. वंचित जात संवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र (वडिलांचे किंवा बालकाचे) :
यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही . उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, यांचे जात प्रमाणपत्र. वडिलांचा किंवा बालकाच्या जातीचा दाखला आवश्यक. पर राज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.

3. बालक दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे : जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.

4. HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे : जिल्हा शिल्लक चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र.

5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला : i. दाखला हा (आर्थिक वर्ष 2020-2021 किंवा 2021-2022 मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले)उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.

6. जन्माचा दाखला : ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला/ रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला /अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्र द्वारे केलेले स्वयं निवेदन.

RTE अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

7. घटस्फोटीत महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे :

  • न्यायालयाचा निर्णय.
  • घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
  • बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

8 .न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे –

  • घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा.
  • घटस्फोट प्रकरणाने प्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
  • बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

RTE अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

9. विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे :

  • पतीचे मृत्युपत्र (प्रमाणपत्र).
  • विधवा महिलेचा किंवा पालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
  • बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

10. एकल पालकत्व असल्यास (Single parent) आवश्यक कागदपत्रे. : आई किंवा वडील यापैकी निवडलेले व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.

11. अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे : I.बालगृह तुम्हाला बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील.
II.जर बालकानाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा संभाळा करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

  • जात विषय कोणता पुरावा ग्राह्य धरावा?

सक्षम प्राधिकार्‍यांच्या स्वाक्षरी असलेला जात विषयक पुरावा ग्राह्य धरावा, पर राज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

  • ऑनलाइन प्रवेश करता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे ?

तर हा पुरावा 2020-2022 चा पाहिजे.

  • कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरता येईल?

उत्पन्नाचा दाखला किमान तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांनी दिलेला असावा परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही.

  • शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर बदली अथवा अन्यकारणाने आरटीई मध्येच शाळा बदलून मिळेल का ?

एकदा शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही .

RTE अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top