Rules change From 1 October आज 1 ऑक्टोबर, महिन्याचा पहिलं दिवस. आजपासून आर्थिक व्यवहारात बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आर्थिक व्यवहारात बदल होत असतात.
Rules change From 1 October आधार कार्ड पासून इन्कम टॅक्स पर्यंत बदल होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी आयकर विषयक बदलांची घोषणा केली होती.
Rules change From 1 October तुमच्या आर्थिक व्यवहारात आजपासून झाले हे बदल :
आधार कार्ड च्या नियमात होणार बदल:
केंद्राचा आधार कार्ड ऐवजी आधार नोंदणी आयडी असा उल्लेख करण्याची परवानगी देण्याची तरतूद बंद करण्याचा निर्णय 1 ऑक्टोबर पासून लागू करण्यात येणार आहे. आयटी रिटर्न भरताना किंवा पॅन कार्ड च्या कागदपत्र मध्ये आधार नोंदणी क्रमांक भरण्याची गरज भासणार नाही. Rules change From 1 October
‘वाद से विश्वास’ योजना सुरू करण्यात येणार:
1 ऑक्टोबर पासून वाद से विश्वास योजना 2024 लागू केली जाणार आहे असे CBDT ने जाहीर केले आहे. याच्या मदतीने आयकर विषयक वाद मिटवले जातील. न्यायालय आणि न्यायाधिकरण समोर असलेले प्रलंबित खटले निकाली काढली जातील.
आरोग्य आणि सामान्य विमा नियमांमध्ये बदल होणार:
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण चे नवीन आरोग्य विमा नियम पॉलिसी धारकांच्या सोयीसाठी १एप्रिल २०२४ पासून लागू झाले आहे. नवा नियम लागू करण्यासाठी विमा कंपन्यांना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती.
नव्या नियमानुसार, कॅशलेस क्लेम ची रिक्वेस्ट आली की, त्यानंतर एक तासात ते मंजूर करावे लागेल. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन तासांच्या आत अंतिम परवानगी मंजूर करावी लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स साठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स:
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स साठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स 0.02% आणि 0.1 % वाढवला आहे. जे उत्पन्न शेअर बायबॅक मधून मिळते, त्या उत्पन्नावर कर आकारला जाईल.
शेअर धारक स्तरावर शेअर बायबॅक वर कर आकारण्यात येईल:
शेअर धारक स्तरावर लाभांश प्रमाणे शेअर बायबॅक वर कर आकारला जाईल. यामुळे गुंतवणूकदारांवर कराचा बोजा वाढणार आहे.
TDS रेट्स
पेमेंट साठीचे टीडीएस दर कलम 19DA, 194H, 194-IB आणि 194M अंतर्गत कमी करण्यात आले आहेत. पूर्वी असलेले पाच टक्के दर आता २ टक्के करण्यात आले आहे त्याचप्रमाणे ई-कॉमर्स ऑपरेटर साठी १ टक्क्यावरून ०.१ टक्के टीडीएस दर करण्यात आला आहे.
क्रेडिट कार्ड वापरताय..? समजून घ्या ‘या’ गोष्टी; अन्यथा येणार अडचणीत
- कलम 19DA: जीवन विमा पॉलिसी साठीचे पेमेंट
- 194G: लॉटरी तिकिटांच्या विक्रीवर कमिशन
- 194H: कमिशन किंवा ब्रोकरेज
- 194M: नामनिर्देशित व्यक्ती किंवा HUF द्वारे विशिष्ट रकमेच्या पेमेंटच्या संबंधात
- 194-IB: हिंदू अविभक्त कुटुंबाद्वारे भाडे भरण्याबाबत
लाइफ इन्शुरन्स पे आउट वरील टीडीएस मध्ये कपात:
एक ऑक्टोबर 2024 पासून लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारक आहेत त्यांना त्यांच्या ते आउट वरील टी डी एस मध्ये कपातीचा फायदा होईल.
जीवन विमा पे आउट वर जो टीडीएस आहे तो 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे.
यामुळे जे पॉलिसीधारक त्यांचे पॉलिसी सरेंडर करतील त्यांना अधिकचे पैसे मिळतील.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.