Divyang Free Computer Course राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय,पुणे व जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेला व संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे.
चालू शैक्षणिक वर्षासाठी या संस्थेत दिव्यांगांसाठी संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.
Divyang Free Computer Course पात्रता व अटी पुढीलप्रमाणे :
सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन विथ एम एस ऑफिस यासाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास, मोटर अँड आर्मेचर वाइंडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स यासाठी किमान नववी पास पात्रता आहे.
यासाठीची वयोमर्यादा 16 ते 40 वर्षापर्यंत आहे.
येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे
या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून फक्त दिव्यांगांनाच यात प्रवेश दिला जाणार आहे.
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे.
अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्किंग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी निदेशक तसेच समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना इत्यादी सोयी सवलती देण्यात येत आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च | Grampanchayat Bandhankarak Kharch
- Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |
- Uniform Civil Code जाणून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय….? काय आहेत फायदे….?
- Non Agricultural Land Certificate आता जमिन NA करण्याची गरज नाही
- Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!
- PM Kusum Solar Scheme शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!
- Atal Pension Yojana 2023 माहिती करून घेऊया अटल पेंशन योजना बद्दल….काय आहे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.