Shaikshanik Dhoran नवीन शैक्षणिक धोरण चालू होणार यावर्षीपासून…

असे असणार आहे नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप :

ट्रेनिंग :

बरेचदा सुरुवातीच्या वर्षी आपल्याला हा अभ्यासक्रम झेपणार नाही असं समजून किंवा आपल्याला ह्या विषयाची आवड नाही असं समजून पहिल्याच वर्षी दुसऱ्या अभ्यासक्रमाला एखादी विद्यार्थी जात असेल, तर त्या विद्यार्थ्याला प्रथम वर्षासाठी सर्टिफिकेट, आणि दुसऱ्या वर्षासाठी पदवीका, व तिसऱ्या वर्षासाठी पदवीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने चार वर्षांचा अभ्यासक्रम 2027 पर्यंत लागू होईल. व राज्यातील विद्यार्थ्यांना मुख्य विषयांसोबतच इतर विषयांची सुद्धा प्रवेश घेता येईल.

क्रेडिट मार्क्स :

नवीन धोरणाचा अभ्यासक्रम लागू केल्यानंतर जवळपास 50 टक्के महत्त्व हे मूळ विषयाला राहणार आहे. सामाजिक शास्त्र विकास या विषयांना राहिलेले 50% महत्व राहणार आहे. यातील कुठलीही एक स्किल शिकावी लागणार आहे. कोणत्याही प्राध्यापकाची नोकरी या नवीन धोरणातील नवीन अभ्यासक्रमामुळे जाणार नाही. मात्र, या नवीन स्किल सर्व प्राध्यापकांना आत्मसात करून त्यांचा अभ्यास करावा लागणार आहे .

या सर्व गोष्टींमुळे प्राध्यापकांचा कामाचा ताण वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. या सर्व शैक्षणिक धोरणासाठी महाविद्यालयांच्या वेळा या ठरवून दिल्या जाणार आहेत. शिवाय अशा अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात येण्याची गरज सुद्धा नाही.

या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तर प्रदेश, नंतर कर्नाटक, व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम ज्या विद्यालयांमध्ये उपलब्ध नसेल तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयामध्ये शिकता येणार आहे. शिवाय एका विद्यापीठातला विद्यार्थी दुसरे विद्यापीठांमध्ये जाऊन शिकू शकतो. व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊन सुद्धा स्किल मिळवण्याची संधी या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या नवीन अभ्यासक्रमा साठी प्राध्यापक व महाविद्यालय तयार असतील का? नवीन आलेले अभ्यासक्रमामुळे महाविद्यालयांची फी वाढेल का? तसेच प्राध्यापकांचा परफॉर्मन्स आणि पगार यांचा संबंध जोडला जाईल का? राज्यातील खेडेगाव भागातील विद्यार्थ्यांनाही ज्या प्रकारे शहरी भागात शिक्षण मिळते त्या प्रकारे मिळेल का? तसेच महाराष्ट्रातील विद्यापीठे एकाच पातळीवर येतील का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या नवीन धोरणामुळे पडलेले आहेत मात्र धोरण सुरू झाले की सर्व काही स्पष्ट होणार आहे .

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top