
अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाईल (Mobile / Cell Phone) वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, मोबाईलच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत.
अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना मोबाईलच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.(Mobile Phone Use restrictions on Government Office)
१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातीलदूरध्वनीचा (Landline) वापर करावा.
२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा,
३. मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
४. मोबाईलवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.
नवनविन माहिती
- EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!
- NFC Recruitment न्यूक्लियर कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू!!!
- CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!
५. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना लघुसंदेशाचा (Text Message)शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवादसाधावा.
६. मोबाईल व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.
७. मोबाईलवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.

८. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.
९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला मोबाईल silent / vibrate mode वर ठेवावा.
१०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान मोबाईल तपासणे, संदेश तपासणे,Sear piece / ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात.
११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवण्यात येऊ नये.
हे वाचले का?
- तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.
- शेळी पालन अनुदान मध्ये घसघशीत वाढ
- मंडल निरीक्षक सर्कल (Circle) यांची भाऊसाहेब कर्तव्ये.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या मोबाईल वापराबाबत नियमावली शासननिर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो म्हणून मारहाण कांगोणीच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्ह