शिधापत्रिका मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
• नवीन शिधापत्रिका/ रेशनकार्ड:
- अर्ज कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज.
- अर्जदार कुटुंब प्रमुख खिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन.
- अर्जासोबत बैंक जॉइंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बैंक पासबुकची प्रत
- आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत.
- नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेल तर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा शिधापत्रिकेत नाव नसलेबाबतचा दाखला.
- राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वतःचे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षांची मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती.
• दुबार शिधापत्रिका/ रेशनकार्ड:
- शिधापत्रिका हरवली असल्यास कार्ड हरविले बाबत पोलीसांचा दाखला.
- स्वस्त धान्य दुकानदारा कडील शिधापत्रिका चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला.
- शिधापत्रिका जीर्ण झाली असल्यास शिधापत्रिका व स्वस्त धान्य दुकानदाराचा सही व शिका असणे आवश्यक आहे.
- जीर्ण कार्ड वरील अक्षर पुसट असेल तर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे.
- अर्जा सोबत ओळखपत्राचा पुरावा.
शिधापत्रिकेमध्ये युनिट वाढ करणे:
- लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची साक्षांकित प्रत.
- पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेर च्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी, यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा दाखला
• शिधापत्रिका/ रेशनकार्ड मधील युनिट कमी करणे:
- मुलींचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका
- मयत असल्यास मयत दाखला
- परवानगी जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज
- अर्जासोबत ओळखपत्र पुरावा.
शिधापत्रिका मिळण्याचा कालावधी
- नवीन शिधापत्रिका १ महिना.
- दुबार शिधापत्रिका ८ दिवस
- शिधापत्रिका नुतनीकरण १ महिना
- शिधापत्रिका मधील नावात बदल व युनिट मध्ये वाढ अथवा घट ३ दिवस
हे वाचले का?
- Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी
- आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
- पोलिस पाटील म्हणजे गावातील चालते बोलते गृह खाते.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.