महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोक प्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशांकात झालेली वाढ तसेच सरपंचाच्या कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन व सरपंच मानधनात (sarpanch Pagar salary) वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागने ३० जुलै, २०१९ रोजी काडलेल्या शासन निर्णय नुसार महाराष्ट्रातील सरपंचांच्या मानधनात (sarpanch Pagar salary) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित असून यासाठी सन “२०१९-२०२० ” या आर्थिक वर्षात रुपया २०० कोटी एवढा निधी राखून ठेवण्यात येत आहे.”
संदर्भाधिन शासन निर्णया नुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्रामनिधीतून खालीलप्रमाणे दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येत होते.
हे ही वाचा
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!
- “ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार.
- गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.
शासन निर्णय
मा.मंत्री (वित्त) महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०१९-२०२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच उपसरपंचांना यापुढे मानधन अनुज्ञेय असेल.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उपसरपंचांना खालील प्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.
सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणा-या मानधनावरील खर्चांपैकी ७५% खर्च शासन उचलेल. उर्वरित २५% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येईल.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हीडीओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा