तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

Talathi Kamkaj

सामान्य नागरिकांना Talathi Office मधे होणारा त्रास व कोणतेही काम वेळेत होत नाही, याच विषयाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने Talathi यांना मार्गदर्शन सुचना जाहीर केलेल्या आहेत या विषयावरील सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहेत.

जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी Talathi office संपर्क साधावा लागतो. परंतू तलाठी हे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे.

जनतेकडून Talathi कार्यालयांशी संबंधित विविध तक्रारवजा सूचना शासनाकडे प्राप्त होत आहेत. जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यालयामध्ये Talathi उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यास्तव खालील सुचनांचे पालन करण्याच्या सूचना सर्व तलाठी कार्यालयांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांनी ६ जानेवारी २०१७ रोजी शासननिर्णय नुसार लागू केल्या आहेत.

हे वाचले का?  Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती

Talathi सज्जावरी तलाठी यांना कामकाजा बाबत मार्गदर्शक सूचना.

१) संबंधित Talathi त्यांचा नियोजित दौरा/बैठका याबाबत कार्यालयाच्या आवारात सूचना फलक लावावा.

२) संबंधीत तलाठी यांनी कार्यालयाच्या आवारात तलाठ्यांची कर्तव्ये / जबाबदाऱ्या याबाबत फलक लावावा.

३) तलाठ्यांनी आपला दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल, अशा स्वरुपात कार्यालयाच्या आवारात लावावा, तसेच लगतचे संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसिलदार यांचे नांव दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत.

४) ज्या सज्जांच्या ठिकाणी तलाठी / मंडळ अधिकारी यांना शासनाने निवासस्थाने उपलब्ध करुन दिली आहेत, त्यांनी त्या निवासस्थानामध्ये राहावे.

हे ही वाचा

हे वाचले का?  आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

५) सेवा हमी कायदयाअंतर्गत नमूद सेवा विषयक बाबीची ( विविध प्रकारचे उतारे, लागणारा कालावधी इ. तपशील) माहिती कार्यालयाच्या आवारात लावावी.

६) संबंधित तलाठी यांनी शेतजमीनी, पिकपहाणी करताना संबंधित शेतजमीनीस भेटीबाबतचा तपशील जाहीर करावा.

७) तलाठी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजा करिता ठेवू नये, असे करणा-यांविरुध्द शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी.

८) विविध दाखले देताना, शासनाने आकारलेले वाजवी शुल्क याबाबतची दरसुची कार्यालयाच्या आवारात लावावी.

तलाठी नियमावली शासननिर्णय GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top