7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..?

7.12 1
7.12 1
7/12

महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड मधील भाग (दोन) महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती या विषयी आहे. त्यानुसार ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन करण्याकरीता, विविध नोंदवह्यांचा गाव नमुना व दुय्यम नोंदवह्या यांचे नमुने विहीत करण्यात आलेले असुन त्याचा गोषवारा देखील देण्यात आलेला आहे.

राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती यांमधील, गाव नमुना नंबर- ७ हा अधिकार अभिलेख या विषयी असून यामध्ये, संबधीत जमिनीच्या भोगवटादार यांचे नाव, शेतीवे स्थानेक नाव, भुमापन क्रमांक, भुधारणा पध्दती, धारण क्षेत्राचा तपशिल [लागवडी योग्य क्षेत्र, पोटखराब क्षेत्र (लागवडी योग्य नसलेले) एकूण क्षेत्र] आकारणी, जुडी किंवा विशेष आकारणी, खाते क्रमांक, कुळाचे नांच, इतर अधिकार या उळक बाबीवा तपशिल समाविष्ट आहे. तर, गाव नमुना नंबर-१२ हा “पिकांची नोंदवही या विषयी आहे

दिनांक २३ जानेवारी, २०१३ अन्वये ई-फेरफार हा ऑनलाईन म्युटेशनचा कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मार्फत “ई-फेरफार” ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. सदर आज्ञावलीव्दारे राज्यभरात ऑनलाईन फेरफार घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

त्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक : सीएलआर-१००३/प्र.क्र.४७/ल-१ सेल, दि. ०३ डिसेंबर २००५ अन्वये या संगणकीकृत अधिकार अभिलेखांना कायदेशीर वैधता देण्यात आली आहे. राज्य शासनाने या विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक : रा.भू.अ.आ.का.२०१६/प्र.क्र.१८०/ल-१. दिनांक ११ जूलै, २०१७ अन्वये हस्तलिखित ७/१२ चे वितरण, दिनांक ३१ जुलै, २०१७ पासून पूर्णतः बंद करून ऑनलाईन फेरफार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.२८४/ल-१, दिनांक ३ मार्च, २०२० अन्वये शासनाने गाव नमुना नं ७/१२ व ८(अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क टाकण्यास मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे विहित गाव नमुना नं.७/१२ मध्ये यथोधित बदल करणेत आला आहे.

हे वाचले का?  PMKSY थेंबा-थेंबातून सिंचनासाठी ‘सूक्ष्म सिंचन योजना’

त्याचवेळी सध्याचा गाव नमुना नं.७/१२ मध्ये अधिका अधिक जमीन विषयक तपशिल खातेदारांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कालानुरूप काही बदल करून, तो संबंधितांना समजण्यासाठी अधिकसोपा होण्यासाठी संगणकीकृत गाव नमुना नं.७ मध्ये सुधारणा करुन ई-फेरफार प्रणालीत ठेवणे व वितरण करणे यास देखील शासनाची मान्यता आवश्यक आहे.


या बाबी विचारात घेवून, “गाव नमुना नं.७ अधिकार अभिलेख पत्रक” चा सुधारित नमूना नव्याने लागू करण्याबाबत आणि अधिकार अभिलेख पत्रक सुधारित नमुन्यात ठेचणे व वितरीत करण्याबाबत क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय:-  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतूदीनुसार क्षेत्रीय महसूली यंत्रणा व प्राधिकारी यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत की, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती मधील 

“गाव नमुना नं.७ अधिकार अभिलेख पत्रक” यामध्ये खालील तपशिल उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोबत जोडलेल्या परिशिष्ट-“अ” मध्ये विहित केलेल्या नमुन्यात अधिकार अभिलेख पत्रक ठेवण्यास आणि वितरीत करण्यास याव्दारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सुधारीत “गाव नमुना नं.७ अधिकार अभिलेख पत्रक” मधील तपशिलाच्या बाबी :-

१. गाव नमुना नं. ७ मध्ये गावाच्या नावा सोबत LGD (Local Government Directory) कोड दर्शविण्यात यावा.
२. गाव नमुना नं.७ मध्ये (अ) लागवडीयोग्य क्षेत्र व (ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात यावे.
३. गाव नमुना नं.७ मधील क्षेत्राचे एकक नमुद करून, यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी. हे एकक वापरावे.
४. गाव नमुना नं.७ मध्ये खाते क्रमांक हा पूर्वी इतरहक्क रकान्या सोबत नमूद केला जात असे, यापुढे खाते क्रमांक खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जावा.
५. गाव नमुना नं.७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री फेलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्याजात होत्या, आत्ता ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून (strike through) दर्शविण्यात यावा.

हे वाचले का?  शेतरस्ते गाडीरस्ते मोकळे होणार शेतावर जाण्याचे पायमार्ग गाव नकाशाप्रमाणे शिवाररस्ते अतिक्रमित व बंद झालेले पाणंद रस्ते

हे ही वाचा

६. कोणत्याही गाव नमुना नं.७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्या खाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात यावेत, तसेच संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एक ही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात यावे.
७. कोणत्याही गाव नमुना नं.७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकान्याच्या खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक हा नवीन रकाना समाविष्ट करून दर्शविण्यात यावा. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई-फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरू झाल्यापासून एखाद्या स.नं. /गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास, शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही,
८. या गाव नमुना नं.७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक गाव नमुना नं.७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात यावेत.
९. गाव नमुना नं.७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात यावा. त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.
१०. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात यावेत. तसेच बिन शेतीच्या गा.न.नं. ७ मध्ये पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच.
११.  इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात यावेत. बिनशेती क्षेत्राचे गाव नमुना नं.७/१२ साठी एकत्रितपणे गा.न.नं.१२ छापून त्याखाली सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाती गाव नमुना न.१२ मधील माहिती भरण्याची आवश्यकता नाही.

हे वाचले का?  7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..

या विषयावरील व्हीडीओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top