तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६

तलाठी यांची महत्त्वाची कामे/ कर्तव्ये (Talathi Kartavya) :

31. तलाठ्याने, त्याच्याकडे चावडीमध्ये प्रसिध्द करण्यासाठी म्हणून पाठवलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश विहित केलेल्या पध्दतीने प्रसिध्द करावे.

32.तलाठ्याकडे दवंडी पिटवून जाहीर करण्याचे आदेश देऊन पाठवण्यात आलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश त्याने दवंडी पिटवून देखील जाहीर करावे.

33. तलाठ्याने पीक आणि कुळवहिवाट आणि सीमा व भूमापन चिन्हे यांचे निरीक्षण प्रत्येक शेताची त्याच जागी, तेथे त्यावेळी उपस्थित असतील असे गावकरी, ग्रामपंचायतीचे सभासद आणि सरपंच असल्यास, यांच्या उपस्थितीत, प्रत्यक्ष पडताळणी करून करावे. निरीक्षणाच्या वेळी तलाठ्याने पुढील गोष्टींची पडताळणी करावी :-

 1. भोगवटदार, कुळे, इतर अधिकार धारक आणि इतर अधिकार यांची नावे प्रत्यक्ष कब्जाशी जुळणारी आहेत.
 2. उपविभागांचा हिशेब योग्य प्रकारे दाखवण्यात आला आहे व या प्रयोजनार्थ नवीन हिश्श्यांची नोंदवही विहित नमुन्यात ठेवण्यात आली आहे.
 3.  “एकाच ओळीत घरे बांधण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम” (प्रिव्हेन्शन ऑफ रिबन डेव्हलपमेंट रूल्स) यांचे योग्य प्रकारे पालन करण्यात आलेले आहे.
 4.  भू-प्रदान आणि पट्टे आणि अकृषिक परवानगी यांच्याशी संलग्न असलेल्या शर्तींचे योग्य प्रकारे पालन करण्यात येते.
 5. अतिक्रमणे आणि अनधिकृतपणे अकृषिक उपयोग यांचा तपास लावून अहवाल सादर केला आहे आणि या प्रयोजनार्थ विहित नमुन्यातील अतिक्रमण नोंदवही ठेवण्यात आली आहे;
 6. नकाशे, गाव नकाशा पुस्तक आणि अधिकार अभिलेख यामधील विसंगतीची प्रकरणे दर्शविणारी नोंदवही अचूक आणि अद्यावत ठेवलेली असून ती शेतातील वास्तविक परिस्थितीशी जुळणारी आहे;
 7. विशेषत: सुधारित बियाणे, दुबार पिके, जल सिंचन पिके, पीक मिश्रणे आणि पडीक जमिनी यांच्या संदर्भात, स्थायी आदेशानुसार पीक विवरण पत्र काळजीपूर्वक संकलित केले आहे.
 8. सीमा आणि भूमापन चिन्हे चांगल्या दुरूस्त स्थितीत आहेत आणि ती नादुरूस्त स्थितीत असल्यास अधिकार अभिलेखातील शेऱ्याच्या स्तंभात त्यांची नोंंद केली आहे;
 9. पाणीपुरवठ्‌याची साधने पीक विवरण पत्रामध्ये गाव नकाशांमध्ये, आणि गाव नमुना अकरामध्ये योग्य प्रकारे दाखवण्यात आली आहेत;
 10. मळईच्या जमिनींचा आणि पाण्याने वाहून गेलेल्या जमिनींचा तपास लावून त्यासंबंधीचा अहवाल यथोचित रित्या सादर केला आहे;
 11. शासनाला संकीर्ण जमीन महसूल मिळवून देणार्‍या लिलावयोग्य बाबींंचा तपास लावून त्यांचा अहवाल सादर केला आहे.भूमापन क्रमांकाचा किंवा भूमापन क्रमांकाच्या उपविभागांचा प्रत्यक्ष कब्जा धारण करणारी व्यक्ती ही अधिकार अभिलेखातील नोंदीनुसार जमिनीची मशागत करण्याचा हक्क  असलेल्या व्यक्तीहून वेगळी असल्याचे तलाठ्याला आढळून आल्यास, त्याने, अधिकार अभिलेखानुसार कब्जा असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्तीहून वेगळ्‌या असलेल्या कब्जा धारण करणाऱ्या व्यक्तींंच्या नोंंदवहीमध्ये त्याच्या नावाची नोंंद घ्यावी, आणि तिच्यातील संबंधित उतारेआवश्यक त्या  कार्यवाहीसाठी तहसिलदाराकडे अग्रेषित करावे. या नोंंदवहीचा नमुना महाराष्ट्रजमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‌या (तयार करणे आणि ठेवणे) नियम, 1971, मध्ये विहित केला आहेे.

जर उपस्थित असलेले गावकरी किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य तलाठ्‌याबरोबर आले नाहीत तर तलाठी आपले वरील कर्तव्य त्यांच्यशिवाय पार पाडील.

34.  कलम 149 अन्वये आवश्यक असलेली सूचना विहित कालावधीमध्ये पाठवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा अधिनियमाच्या कलम 151 अन्वये आवश्यक असलेली माहिती पुरवण्यात किंवा कागदपत्र सादर करण्यात कसूर करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या नावाची तलाठ्‌याने विलंब शुल्क नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी आणि नोंदवही प्रमाणन अधिकाऱ्याच्या आदेशार्थ प्रस्तुत करावी.

35. संबंधित कुळवहिवाट कायदा, आणि मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 याच्या तरतुदींचे उल्लंघन करून झालेल्या व्यवहारासंबंधीचे प्रतिवेदक तलाठयाने तहसीलदाराकडे पाठवावे.

36.तलाठ्‌याने जमिनीच्या सर्व तुकड्यांची फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करावी आणि अधिकार अभिलेख ठेव्यासंबंधीच्या नियमांनुसार द्यावयाच्या व प्रसिध्द करावयाच्या नोटिसांशिवाय एकत्रीकरण अधिनियमान्वये विहित नमुन्यातील नोटिसा संबंधित व्यक्तींना पाठवाव्या.

37.  तलाठयाने वारसा प्रकरणांची नोंदवही विहित नमुन्यात ठेवावी व वारसासंबंधीच्या नोंदी करतांना हिंदु उत्तराधिकार अधिनियमातील उपबंध आणि वारसांचे चार प्रकार व हिंदू विधवांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंबंधीचा अधिनियम, आणि मुसलमान जमात आणि इतर जमाती यासंबंधीचे कायदे  लक्षात ठेवावे.

38.  तलाठयाने गहाळ दुव्यांची प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 151 मधील उपबंधांचा अवलंब करून आणि भूमापन  अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त करून निकालात काढावी.

39. तलाठयाने त्याच्या सझ्यातील गावांमध्ये घडणार्‍या पूर, आग, धुके, गारपीट, टोळधाड, माणसांचे किंवा गुरांचे साथीचे रोग, पिकेबुडणे इत्यादीं सारख्या नैसर्गिक आणि इतर आपत्तींचा अहवाल मंडल निरीक्षकाकडे आणि तहसीलदाराकडे पाठवावा.

40. तलाठयाने मुंबई कृषि उपद्रवी कीड आणि रोग अधिनियम, 1947 अन्वये, कोणत्याही गावात कोणतेही कीटक, उपद्रवी कीट, इत्यादींंच्या प्रादुर्भावासंबंधीचा अहवाल जिल्हाधिऱ्याकडे पाठवावा.

41.  जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठयाने एकाधिकार प्रापणाच्या प्रयोजनार्थ शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शेतकरी सूची पत्रके तयार  करावी व ठेवावी.

42. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठयाने गावातील शिधा पत्रिकांची सूची तयार करावी.

43.  जिल्हाधिकारी आदेश  देईल तेव्हा, तलाठ्याने शेतकर्‍याकडून साठ्यांसंबंधी प्रतिज्ञा पत्रे मिळवावी.

44.  जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, जमिनधारक आपल्या धान्याची विक्री शसकीय आदेशानुसार एकाधिकार खरेदी योजनेखाली करतील अशी व्यवस्था तलाठ्याने करावी.

45.  जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने गावकऱ्यांना शिधापत्रिका द्याव्या.

46. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने लेव्ही नोंदवही ठेवावी व खातेदारांना मागणी नोटीसा पाठवाव्या.

47. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने दुर्गम प्रदेशातील नागरी पुरवठ्याच्या पावसाळी केंद्राचा गोदाम पाल म्हणून काम करावे.

48. तलाठ्याने सर्व विभागांच्या शासकीय कर्मचार्‍यांच्या जमीनदारांच्या पतदारीसंबंधी अहवाल सादर करावा.

49. सार्वत्रिक निवडणूक आणि जिल्हा परिषद अणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुका यांच्यासाठी तलाठ्याने मतदारांच्या याद्या तयार कराव्या.

50. तलाठ्याने निवडणूक अधिकार्‍यांना त्यांच्या निवडणूकीविषयी कर्तव्यामध्ये मदत करावी.

51.गावांमध्ये अल्प बचत कार्यक्रम आयोजित करण्यात अल्प बचत अधिकार्‍यांना तलाठ्याने मदत करावी.

52.  गावांमधील अल्प बचत योजनेत पैसे गुंतवणारांच्या नावांच्या नोंदवह्या ठेवाव्या.

53. ग्रामीण ऋणपत्रांची कर्जरोखे विक्री तलाठ्याने करावी.

54. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दारूबंदी सप्ताह, हरिजन सप्ताह, वनमहोत्सव, इत्यादी साजरे करण्यास मदत करावी.

55.राजपत्रित अधिकार्‍यांकडून सूचना मिळाल्यावर किंवा अराजपत्रित अधिकार्‍यांच्या बाबतीत तहसीलदाराकडून सूचना मिळाल्यावर, तलाठ्याने  निरनिराळ्या शासकीय विभागांच्या निरनिराळ्या शासकीय अधिकार्‍यांसमवेत उपस्थित राहावे व त्यांना हवी असलेली कोणतीही माहिती पुरवावी.

56. सर्व भूमापन कामे चालू असताना भूमापन अधिकार्‍यांना तलाठ्याने आवश्यक ते सहाय्य द्यावे.

57. तलाठ्याने आपल्या सझ्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी ठरवून देईल अशा इतर कोणत्याही ठिकाणी राहावे; इतरत्र कोठेही  राहू नये.

58.तलाठ्याने एक दैनंदिनी ठेवावी आणि, तपासणी आणि शेरे व/वा अनुदेश देण्यासाठी, वरिष्ठ महसूल आणि भूमापन अधिकारी यांनी मागणी केल्यावर ती त्यांना सादर करावी.

59. तलाठ्याने एक भेटनोंद पुस्तक ठेवावे आणि ते भेट देणाऱ्या प्रत्येक महसूल आणि भूमापन अधिकाऱ्यासमोर पृष्ठांकन आणि असल्यास शेरा, यासाठी सादर करावे.

60.तलाठ्याने त्याच्या ताब्यातील ग्राम अभिलेखांच्या प्रती किंवा त्यांचे उतारे, त्यांकरिता अर्ज करणाऱ्या हितसंबधित व्यक्तींना, अर्ज मिळाल्यापासून 24 तासांच्या आत, नक्कल शुल्क घेऊन द्यावे आणि अशा रीतीने वसूल केलेल्या शुल्काचा हिशेब ठेवावा.

61. तलाठ्याने तगार्ठ आणि इतर सर्व शासकीय येणी यांचे लेखे त्याकरिता विहित केलेल्या नमुन्यात ठेवावे.

62.ज्या प्रयोजनार्थ तगाई कर्जे देण्यात आली असतील त्यांकरिता ती वापरण्यात येतात किंवा कसे ते तलाठ्याने तपासावे, आणि कोणताही गैरवापर त्याच्या निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तहसीलदाराकडे अहवाल पाठवावा.

63.तलाठ्याने आपल्या ताब्यातील सर्व शासकीय मालमत्तांची नोंदवही ठेवावी, आणि तपासणी व सहीसाठी ती निरीक्षण अधिकाऱ्याला सादर करावी.

64.  तलाठ्याने पोष्टाच्या सरकारी तिकिटांची नोंदवही विहित केलेल्या नमुन्यात ठेवावी.

65. त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही कायदा किंवा नियम, किंवा शासनाने वेळोवेळी काढलेले सर्वसाधारण किंवा विशेष आदेश, किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेले कोणतेही निर्देश या अन्वये विहित केलेली सर्व कर्तव्ये तलाठ्याने पार पाडली पाहिजेत.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top