गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.

gav Kari

सहज सुचलं- गावं करील तो राव काय? यात्रा,सण उत्सव,अखंड हरीणाम सप्ताह बंद. गाव तेथे विलगीकरण कक्ष…सुरू करण्याचे आवाहन……

कोरोनाच्या रूद्र रूपाने हवालदिल झालेली जनता कसायाच्या दारात बांधलेल्या बोकडासारखा वाईट अनुभव घेत आहे.

सरकारचा अंकुश नसलेल्या खाजगी दवाखान्यात रूग्णांच्या आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या बोकांडी बसलेल्या लाखोंच्या बिलामुळे हतबल झालेले लोक मग तो गरीब असो वा श्रीमंत ढसढसा रडण्यापेक्षा…!

गावं करील तो राव काय?

अशी परीस्थीती वाढण्याची शक्यता निर्माण होत असून त्या झळीतून कुणी वाचणार नाही असेच दिसते.   देशाची खिळखीळी झालेली अर्थव्यवस्था १३५ कोटी लोकांची वैद्यकीय सोई पुरवण्यासाठी पुरेशी नाही हे उघड झाले आहे.

ज्यांचा प्रपंच मोठा आहे तो सहज निपटून नेईल परंतु हातावरच्याला मरणाशीवाय पर्याय राहणार नाही.जसे कोळ्याच्या जाळ्यात अडकणार्‍या माशांप्रमाणे तडफडून मरण्याशीवाय पर्याय उरलेला दिसत नाही.

तसे कोरोनापुढे हतबल झालेलं सरकार आणि रोजच्या स्मशानातील गर्दी व आक्रोश हा कोरोनाचा शिरकाव संपणारा विषय दिसत नाही.

हे वाचले का?  सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.

त्यामुळे प्रत्येक गावागावात गावकरी हरीणाम सप्ताह,देवदेवतांच्या यात्रा,सण,उत्सव,पारायणे, आपण आपले पूर्वज एकत्रीत साजरे करतानां उंबर्‍याप्रमाणे वर्गणी गोळा करून तमाशा,कुस्त्या,बैलशर्यती,हंगाम्याचा आनंद घेत होते.

याप्रमाणेच आता प्रत्येक गावाने गावातील शाळा,धार्मीक स्थळे,मंगल कार्यालय यामध्ये उबंर्‍यामागे १ खाट व ऐपतीची रक्कम गोळा करून कोरोना रूग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करावा.

जेणे करून रूग्णाला गावातच उपचार होतील.तसेच जवळच्या शासकीय रूग्णालयाचे डाॅक्टर,नर्स,आशा मदतनिस व गावातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या लोकांची मदत घेवून गावातील कोरोना सशंयीत लोक बरे होण्यात हातभार लाभेल आणि गाव वर्गणीतून जमा झालेली रक्कम याच रूग्णांसाठी खर्च होईल, सरकारी तिजोरीवरील ताण कमी होईल.तसेच या पैशातून आपल्याच गावातील कुणीएक कोरोनाचा बळी होण्यापासून वाचवता येईल व गंभीर गरजू रूग्णांना अत्यावश्यक सेवेसाठी सहजरीत्या जागा उपलब्ध होण्यास मदत मिळु शकेल.

हे वाचले का?  सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi

अशा पध्दतीने नियोजन झाल्यास वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडणार नाही व खाजगी दवाखान्यांच्या बेसूमार लुटीपासुन काही प्रमाणात वाव मिळेल.अशा संकल्पनेला गावातील कुणीच विरोध करणार नाही कारण प्रत्येक गावातील लोकांनी कोरोनातील मृत्यु जवळून पाहीला असेल.वेळ आपण सहज निभावून नेवू शकतो,पण काळ नाही.आता प्रगल्भ ईच्छाशक्तीची गरज आहे,गावराजकारणाची नाही.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

कारण देवाला लाखोंची वर्गनी गोळा करून जो आनंद आपण लुटत घेत होतो तो पुन्हा मिळवायचा असेल तर गावातील प्रत्येक व्यक्ती वाचला पाहीजे. गावोगाव कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करूनच.अन्यथा जत्रा,सण,उत्सव,सप्ताह हे “वाचाल तर पहाल”.गाव आपलेच आहे या भूमिकेतून त्यासाठी “गाव करील ते राव करणार नाही” या मराठीतील म्हणीचे अनुकरण करताना कोरोना महामारीवर विजय मिळवणे सहज शक्य होईल यापेक्षा मोठे प्रेरणादायी व पुण्याचे काम कशातच असू शकत नाही.

हे वाचले का?  घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?

लेखक- अज्ञात

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top