तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी (Tukade Bandi Kayda)

तुकडेबंदी कायदा विरुद्ध व्यवहाराबाबत (खंड ४ पा नं. १५१ नियम १२)

जिल्हाधिकारी यांचे परवानगी शिवाय भोगवट्याचा अधिकार हस्तांतरणास नसेल अशा बाबतीत जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळवण्यात आली आहे काय. शोधून पहावे अशी परवानगी मिळविलेली नसल्यास त्या जमिनीची भोगवटदार म्हणून नोंद करणेत येत नाही अशी तुकडेबंदी कायदा यामध्ये तरतूद आहे.

तसेच सकृत दर्शनी कुळ वहिवाट कायद्याचे किंवा तुकडेबंदी, तुकडेजोड कायद्याचे उल्लंघन व धारण जमिनीचे एकत्रीकरण अधिनियमाचे किंवा परामर्यादा (सिलिंग) कायद्याचे उल्लंघन करून हक्क संपादन केलेला असलेस अशा व्यक्तीची भोगवटादार म्हणून नोंद करण्यात येत नाही.

तसेच एक वेळ रद्द झालेली नोंद परत घालता येत नाही त्याबाबत संबंधितांना मा. उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपिल करून निर्णय झालेवरच नोंद करता येते.

मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७

तुकड्याचे प्रमाण क्षेत्र

योग्य ती चौकशी करून आणि जिल्हा सल्लागार समितीशी विचारविनिमय करून शासन कोणत्याही स्थानिक क्षेत्रातील जमिनीच्या कोणत्याही वर्गासाठी किमान क्षेत्राचा स्वतंत्र तुकडा तात्पुरता ठरवेल हे प्रमाणक्षेत्र तुकडा ठरविताना त्यात फायदेशीर लागवड होईल प्रामुख्याने विचार करायचा आहे ही तात्पुरती किमान क्षेत्रे जाहीर करून त्या संबंधीचे आक्षेप माग विण्यात येतील.

तीन महिन्याच्या आत जे आक्षेप आल असतील त्याचा विचार करून आवश्यक ती चौकशी करून स्थानिक क्षेत्रातील जमिनीच्या प्रत्येक वर्गासाठी शासन प्रमाण क्षेत्र ठरवील. या प्रमाणे ठरविण्यात आलेल्या प्रमाण क्षेत्रामध्ये फेरबदल शासन करू शकते पण हा फेरबदल करताना नमुद केलेली कार्यपध्दती अवलंबायची आहे (४-५) या बाबतची कार्यवाही पुरी झाली असून स्थानिक क्षेत्रासाठी जमिनीच्या प्रत्येक वर्गाकरिता स्वतंत्र प्रमाण क्षेत्र ठरविण्यात आले आहे.

तुकडयाची गाव नमुना सात मध्ये नोंद करणे

वर नमुद केल्याप्रमाणे स्थानिक क्षेत्रातील जमिनीच्या प्रत्येक वर्गांसाठी तुकड्याचे क्षेत्र ठरवल्यावर ते अधिसुचनेने प्रसिध्द केले जाते. अशी अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर अशा ठरविलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेला भू-मापन क्रमांक आणि पोटहिस्सा हा तुकडा म्हणून मानायचा आहे. गाव नमुना सहामध्ये सर्व अशा तुकड्यांबाबत एक फेरफार करायचा आहे व नंतर मग अशा सर्व तुकड्यांचा गाव नमुना सात मध्ये इतर हक्क सदरी तुका म्हणून नोंद करायची आहे. (६)

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top