Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना…

Rajiv Gandhi Awas Yojana

RajivGandhi Awas Yojana मित्रांनो राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक 1 व 2 मध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेवरील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या बेघर आणि अल्पभूधारक अशा गरजू लोकांसाठी घरे बांधावी म्हणून ही योजना चालू केलेली आहे.

यातील राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक 1 ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी राबविण्यात येत आहे हि योजना इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबवली जाते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Rajiv Gandhi Awas Yojana राजीव गांधी ग्रामीण आवास योजना :

Rajiv Gandhi Awas Yojana राजीव गांधी ग्रामीण आवास योजना इंदिरा आवास योजने प्रमाणेच असून सदर योजनेच्या निधीचा पुरवठा हा राज्य सरकारकडून केला जातो.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना 2 ही योजना दारिद्र्यरेषेवरील परंतु वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांत करीता राबविण्यात येत असते. या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला 45 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळते.

27 ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयानुसार 2 क्रमांकाची योजना सुधारित करण्यात आलेली असून ही दारिद्रय रेषेवरील परंतु वार्षिक उत्पन्न 96 हजार पेक्षा कमी असलेल्या कुटुंबाकरिता राबविण्यात येणार आहे. एक लाभार्थी कुटुंबाला 90,000 रुपये बिन व्याजाचे कर्ज व लाभार्थी स्वहिस्सा १० हजार रुपये असे मिळून १ लाख रुपये किमतीचे घरकुल लाभार्थीस सरकार मार्फत देण्यात येते.

हे वाचले का?  सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे 90 हजाराचे बिनव्याजी चे कर्ज लाभार्थ्याने महिन्याला 833 याप्रमाणे दहा वर्षांमध्ये परतफेड करावयाचे असते. घर बांधण्यासाठी लाभार्थ्याने स्वतःच्या मालकीचे किंवा शासकीय किंवा ग्रामपंचायत मालकीचे साडेसातशे ७५० चौ.फुट भूखंड क्षेत्रफळ आवश्यक असते त्यापैकी २६९ चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ करणे आवश्यक असते.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे नाव हे गृहनिर्माण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 22 ऑगस्ट 2014 बदलून ते राजीव गांधी घरकुल योजना असे नामकरण करण्यात आलेले आहे.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना हे जून 2011 मध्ये लागू करण्यात आलेली आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आली. भारत देशाला झोपडपट्टी मुक्त बनवण्यासाठी ही योजना आणलेली असून आवास आणि शहरी गरीबी निर्मूलन विभागामार्फत ही योजना राबवली जाते योजना केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे.

राजीव गांधी आवास योजना दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आली :

  • योजनेची तयारी 2011 मध्ये सुरू झालेली असून 2013 मध्ये ती संपली.
  • या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झोपडपट्टी विकास योजना राबवली गेली. या योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.

उद्देश :
राजीव गांधी आवास योजना निवडक झोपडपट्टी क्षेत्रात पायाभूत राहण्यायोग्य आणि सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. राजीव आवास योजनेच्या उद्दिष्टांमध्ये खालील घटक सामील होतात.

हे वाचले का?  सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राजीव गांधी आवास योजना सर्व झोपडपट्टी क्षेत्राला कहर करते. व सरकारची नोंदणीकृत  झोपडपट्टी बिगरनोंदणीकृत झोपडपट्ट्या यामध्ये कव्हर केल्या जातात. याचबरोबर राजीव गांधी आवास योजनेचा उद्देश हा आवास, नागरिक सुविधा आणि सामाजिक सुविधांसाठी पायाभूत मार्गदर्शन प्रदान करणे हा आहे. या योजनेचा उद्देश झोपडपट्टी ला घरांमध्ये बदलणे हा आहे. या धोरणाला इन-सीटू या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रूपात ओळखले जाते.

या योजनेचा उद्देश पेयजल पुरवठा, रस्ते, स्ट्रीट लाइट, वीज आणि सीवरेज सुविधा सारख्या नागरी सुविधा प्रदान करणे आहे.

क्रेडिट सुविधांपर्यंत सुलभ पोहोचणे सक्षम करण्यासाठी ही योजना राष्ट्रीयकृत बँक आणि आर्थिक कंपन्यांना विविध प्रकारे लघु कर्ज आणि क्रेडिट सुविधा प्रदान करून नागरिकांना एक सहाय्यक वातावरण निर्माण करते.

या योजनेचा उद्देश कौशल्य विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी वासियांच्या रोजगार क्षमतेत व त्यांच्या उत्पन्न क्षमतेत वाढ करणे, व झोपडपट्टी आणि आसपास क्षेत्रातील अस्वच्छ स्थितीमध्ये सुधारणा करणे हा आहे.

क्षमता निर्माण करून संसाधनांचा उपयोग करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून , महानगरपालिका नगरपालिका तसेच नगर परिषदांना सहायता करून विकास करणे.

या योजनेमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्याला समूहाला सशक्त बनवून विकासा विकासामध्ये त्यांचे योगदान निश्चित करून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे.

हे वाचले का?  Online Shopping Tips दिवाळीची शॉपिंग ऑनलाइन करताय? ही काळजी नक्की घ्या |

केंद्र सरकारचे लक्ष विविध प्रकारच्या सामुदायिक विकास आणि क्षमता तसेच विकास योजनांच्या माध्यमातून गरीब लोकांचा आर्थिक स्तर सुधारणे व या योजनेतून झोपडपट्टी निर्मूलन आणि झोपडपट्टी पुनर्वसन कार्यात मदत करणे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top