Pm Udyogini Yojana व्यवसायासाठी महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज….. बघा काय आहे योजना?

Pm Udyogini Yojana

Pm Udyogini Yojana केंद्र सरकारकडून महिलांना सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत असते. प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहे.

महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी अनेक बँकांनी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्योगिनी योजना ही बँकांच्या माध्यमातून राबविली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

Pm Udyogini Yojana काय आहे उद्योगिनी योजना:

ही एक महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. यामध्ये महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत विना तारण कर्ज दिले जाते. तसेच काही महिलांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांनी स्वावलंबी होणे, तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे, महत्त्वाचे आहे.

हे वाचले का?  Social Welfare Schemes जाणून घेऊया समाज कल्याण विभागाच्या विविध योजना…..!!

व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांकडे काही वेळेला पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होते. परंतु महिलांकडे कौशल्य असते. अशा महिलांसाठी उद्योगिनी योजना फायदेशीर ठरू शकते.

पात्रता:

  • योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारी व्यक्ति महिला असावी.
  • 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयांपर्यंत असावे.
  • व्यवसाय कर्ज घेण्यासाठी फक्त महिला व्यवसाय मालक पात्र आहे.

या बँकांमध्ये करता येतो अर्ज:

अनेक खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये या योजनेसाठी कर्ज मिळू शकते. सिंध बँक, पंजाब बँक, सारस्वत बँक यासारख्या बँकेमधून महिलांना कर्ज सहज मिळू शकते.

येथे क्लिक करून पहा कोणत्या कामांसाठी मिळते बिनव्याजी कर्ज

या महिलांना मिळते बिनव्याजी कर्ज:

महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी अनेक बँका पुढे आल्या आहे. उद्योजिनी योजनेअंतर्गत महिलांना 3 लाख रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. अनुसूचित जाती/जमाती, शारीरिकदृष्ट्या विकलांग महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते.

हे वाचले का?  Garpit Nuksan Bharpai Update अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार |

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top