7/12 Correction पूर्वी सातबारा उतारा हा हस्तलिखित असायचा, त्यावेळी लिहिताना काही वेळ चुका व्हायच्या, तसेच संगणकावर सातबारा उतारा किंवा शेती संबंधित कागदपत्रे आहेत, ते टाइप करताना काही वेळ चुका झालेल्या आहेत.
ऑनलाइन किंवा हस्तलिखित सातबारा मध्ये 7/12 चे क्षेत्र, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र यामध्ये जर चूक आढळून आली तर आपण अशा प्रकारच्या दुरुस्तीसाठी(7/12 Correction) तलाठी कडे ऑनलाइन पद्धतीने ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकतो.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Sarpanch Jababdari या आहेत सरपंचांच्या जबाबदाऱ्या
7/12 Correction असे करा सातबारा मध्ये दुरुस्ती:
सातबारा मध्ये दुरुस्ती करण्यासाठी भूमीअभिलेख विभागाच्या www.bhumiabhilekh.maharashtra. gov.in या लिंक वर क्लिक करून Mutation 7/12 या पर्यायामध्ये असलेल्या माहितीनुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगिन करून जूना 7/12 ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावा.
यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाइट वर यूजर अकाऊंट तयार करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी हवा तो पासवर्ड टाकून सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या मोबाइल व ईमेल वर जो ओटीपी येईल तो टाकून पुढे दिलेली सर्व माहिती टाकून सबमिट करा. त्यानंतर मेल आयडी आणि अकाऊंट तयार करताना जो पासवर्ड वापरला तो टाकून लॉगिन करा.
त्यानंतर Mutation 7/12 या पर्यायावर क्लिक करून सातबारा मध्ये तुम्हाला जी दुरुस्ती करायची आहे, ती माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करावी, आणि सबमिट करावे. त्याची प्रिंट काढून तलाठी कार्यालयामध्ये जाऊन जमा करावी.
तलाठी हे सर्व पुरावे तपासून झालेली दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठी पाठविली जाते. तहसीलदार तलाठ्याला चौकशी चे आदेश देतात.
अशा चुका वेळीच दुरुस्त करणे गरजेचे आहे, अन्यथा नंतर हे कटकटीचे ठरू शकते. सातबाऱ्याचे पुनर्लेखन हे दर दहा वर्षांनी केले जाते. जर एखाद्या खातेदाराचे नाव पूर्वीच्या अभिलेखात असेल आणि नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची दुरुस्ती ही कलम 155 अंतर्गत दुरुस्त करता येते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा