Gas Consumer Rights एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार

Gas Consumer Rights
Gas Consumer Rights
Gas Consumer Rights

एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार Gas Consumer Rights

  • गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेणे बंधनकारक नाही. Gas Consumer Rights
  • सिलेंडर घेताना वे वजन काट्यावर तोलून घ्या
  • कॅश अॅण्ड कॅरी केल्यास १५ रूपये रिबेट मागा
  • दोन बुकींग दरम्यान २१ दिवस थांबण्याची गरज नाही.
  • दोन वर्षातून एकदा शेगडी ट्यूब रेग्युलेटर यांची तपासणी आवश्यक.

कोणतीही तक्रार असल्यास गॅस कंपनीच्या अधिकार्‍यास संपर्क करा.

  • वेबसाईट वरून ऑनलाईन तक्रार करा.
  • http://www.hindustanpetroleum.com/LPGHome
  • http://www.ebharatgas.com/
  • http://indane.co.in/

🔴 प्रश्न: नवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता काय प्रक्रिया आहे ? Gas Consumer Rights

🟢 उत्तर: निवासाच्या जवळ असलेल्या घरगुती गॅस वितरकाकडे नवीन गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करता येईल. तसेच नवीन गॅस कनेक्शन करिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीसाठी www.bharatpetroleum.com इंडियन ऑइल कंपनीसाठी spandan.indianoil.co.in व
हिंदोस्थान पेट्रोलियम कंपनीसाठी www.hindustanpetroleum.com या लिंकचा वापर करावा.

🔴 प्रश्न: नवीन घरगुती गॅस कनेक्शन मिळणेसाठी किती रक्कम भरावी लागेल ?

🟢 उत्तर: १ एका गॅस सिलेंडर करिता रूपये 1670 /- (अनामत रक्कम)
२. दोन गॅस सिलेंडर करिता रूपये 1450/- प्रति सिलेंडर याप्रमाणे २,९००/- (अनामत रक्कम)
३. रेग्युलेटरसाठी रूपये १५०/- (अनामत रक्कम) या सर्व भरलेल्या पैशाची पावती मिळते.

या किंमती डिसेंबर 2019 अखेरच्या आहेत. यापेक्षा अधिक रकमेची मागणी केली असल्यास गॅस कंपनीच्या वेबसाईट जाऊन रक्कमेची खातरजमा करावी.

🔴 प्रश्न: KYC म्हणजे काय ?

🟢 उत्तर: के. वाय. सी..( Know Your Consumer) म्हणजे ग्राहकाचे निवासाचा व ओळखीबाबतची माहिती नमूद असलेला तसेच ग्राहकाचे वैयक्तिक माहितीचा तपशील असलेला फॉर्म आहे.

🔴 प्रश्न: : के. वाय. सी. फॉर्म कोठे मिळेल ?

🟢 उत्तर: KYC फॉर्म आपले विभागातील वितरकाकडे मोफत उपलब्ध आहेत.

🔴 प्रश्न: नवीन गॅस कनेक्शन घेतेवेळी गॅस शेगडी व गॅस विषयक इतर साहित्य वितरकाकडून घेणे बंधनकारक आहे का?

🟢 उत्तर: नाही तुम्ही गॅस वितरकाव्यतिरिक्त अन्य दुकानातून ISI प्रमाणित गॅस शेगडी खरेदी करू शकता. तुम्ही बाहेरून शेगडी घेतल्यास गॅस एजन्सीचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन व्हेरीफिकेशन करतो त्यांची योग्य ती फिस भरावी व पावती घ्यावी.

गॅस एजन्सी कडून शेगडी घेणे बंधनकारक नाही असा फलक एजन्सी च्या कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेतून लावला पाहिजे असा शासन आदेश आहे.

गॅस एजन्सी च्या ऑफिसामध्ये गॅस वितरकांचे नाव पत्ता संपर्क क्रमांक गॅस / तेल कंपनीच्या अधिकार्‍याचे संपर्क क्रमांक ई मेल आयडी इत्यादी तपशील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.

जर एजन्सी नाव पत्ता चालक तुम्हाला शेगडी घेण्याची सक्ती करीत असेल तर तुम्ही तेल कंपनीच्या अधिकार्‍यांकडे तसेच कंपनीच्या वेबसाईट जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवावी.

हे वाचले का?  बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

🔴 प्रश्नः गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती झाल्यास संपर्क कोठे साधावा ?

🟢 उत्तर: गॅस सिलेंडर मध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे तात्काळ (Emergency Service Cell (ESC)) येथे संपर्क साधावा. गॅस रिफील पावतीचे मागील बाजूस केंद्राचे (Emergency Service Cell (ESC)) दूरध्वनी क्रमांक नमूद आहेत.

🔴 प्रश्नः घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी कोठे संपर्क साधावा ?

🟢 उत्तर: घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळ्या बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी Gas Consumer Rights सहाय्यता केंद्र (LPG Customer Service Cell) किंवा जवळचे LPG Gas company क्षेत्रिय कार्यालयात संपर्क साधावा. तसेच आपण तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता किंवा

कंपनीच्या हेल्पलाइन ऑइल इंडस्ट्री: 18002333555 (टोल फ्री), भारत पेट्रोलियम: 020-26345141/42, 26342176 हिंदुस्थान पेट्रोलियम 020-26213104/05 आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 020-26332661

संपर्क साधू शकता. तसेच आपल्या तालुक्यातील शिधावाटप अधिकारी वा तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांच्याकडेही तक्रार करू शकता.

🔴 प्रश्न: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा मोटार सायकल, गिझर इत्यादी करिता वापर करता येईल का ?

🟢उत्तर : LPG नियंत्रण कायदान्वये घरगुती वापराचे Gas Cylinder मोटार सायकल, गिझर इत्यादी करिता वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मोटार सायकलमध्ये Auto LPG चा वापर करू शकता. तथापि, घरगुती सिलेंडरचा स्वयंपाकाचे इंधन (cooking fuel) म्हणूनच मर्यादित आहे.

🔴 प्रश्नः ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच आणून देणं बंधनकारक आहे का?
🟢 उत्तर: होय, वितरका मार्फत गॅस सिलेंडर ग्राहकांचे राहत्या घरी पोहोचवण्यात येतो. याकरिता स्वतंत्र शुल्क आकारणात येत नाही. वितरकाच्या कार्य क्षेत्राबाहेर सिलेंडर पोहचविण्या करिता निर्धारित भाडे आकारले जाते.

🔴 प्रश्नः सिलेंडरमध्ये कमी गॅस भरलेला कसे ओळखावे ? याची खातरजमा कशी करावी ?
🟢 उत्तर: गॅस सिलेंडर घरी पोहचविणाऱ्या कर्मचार्‍याकडे वजने मापे निरीक्षकांनी प्रमाणित करून दिलेला वजन काटा असणे बंधनकारक आहे. माझ्याकडे वजन काटा नाही असे कायद्याने तो म्हणू शकत नाही.

घरगुती वापराच्या सिलेंडरमधील सिलेंडर मधील गॅस चे वजन १४.२ किलो इतके असते. आपण घेत असलेल्या सिलेंडरमध्ये खरेच १४.२ किलो गॅस भरलेला आहे काय याची खातरजमा करून घ्यावी.

रिकामा सिलेंडर वजन सिलेंडरच्या वरच्या भागावर प्रिंट केलेले असते. सिलेंडर रिकामे वजन अधिक १४.२ किलो म्हणजेच सिलेंडर एकूण वजन भरेल. भरलेल्या सिलेंडर एकूण वजन वजा करून सिलेंडरच्या रिकाम्या टाकीचे वजन बरोबर सिलेंडरमधील एकूण गॅसचे वजन हे वजन १४ किलो २०० ग्रॅम इतके आले पाहिजे.

यात साधारणतः १५० ग्रॅम चा फरक प्रमाण मानला जातो. जर सिलेंडरमधील गॅस चे वजन १४ किलो ५० ग्रॅम पेक्षा कमी असेल तर असा सिलेंडर कमी वजनाचा सिलेंडर ग्राहकांनी घेऊ नये. तो बदलून योग्य त्या वजनाचा दुसरा सिलेंडर मागावा.

हे वाचले का?  गणेशोत्सव वर निर्बंध व २०२१ मार्गदर्शक सूचना

🔴 प्रश्न: कॅश अन्ड कॅरी म्हणजे काय ? आपण स्वत: सिलेंडर घेऊन आलो तर वाहतूक खर्च म्हणून आपणास आकारले जाणारे पैसे परत मिळतात काय?

🟢 उत्तर: जेव्हा कधी कधी आपण गॅस एजन्सीच्या गोदामावर / कार्यालयात जाऊन आपण स्वतः पैसे देऊन भरलेला सिलेंडर घेऊन येतो. यास कॅश अॅण्ड कॅरी म्हणतात.

अशा वेळी ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या एकूण किंमतीमध्ये वाहतूक खर्च वजा केला पाहिजे. म्हणजेच १५ रूपये वाहतूक सवलत मूल्य म्हणून कमी घेतले पाहिजेत. आपण कष्ट करून पैसे कमावतो. तेव्हा कॅश अॅण्ड कॅरी करताना एजन्सी ला हे १५ रूपये कमी द्यावेत.

🔴 प्रश्न घरगुती गॅस सिलेंडरचे दोन बुकींगमधील कालावधी किती दिवासचा असेल ? Gas Consumer Rights :

🟢 उत्तर: घरगुती गॅस सिलेंडरचे दोन बँकिंगमधील कालावधी ग्राहकाच्या गरजेनुसार असेल. दोन बुकींग मधील अंतर किमान १८ दिवस किंवा २१ दिवसाचे असेत असे बऱ्याच वेळा गॅस एजन्सीतून सांगितले जाते.

परंतु गॅस अॅण्ड ऑइल खात्याच्या कायद्याप्रमाणे वा गॅस कंपनीच्या नियमाप्रमाणे असे कोणतेही नियमाचे बंधन नाही. आपल्या गरजेनुसार आपण बुकींग करू शकतो.

🔴 प्रश्न: सिलेंडरची एक्सपायरी डेट असते काय ? ती कशी ओळखावी ?
🟢 उत्तर: घरगुती गॅस चा सिलेंडर हा भक्कम अशा धातू पासून व पूर्ण सुरक्षीत राहिल असा बनविलेला असतो. परंतु सिलेंडर भरल्यानंतर अतिल गॅसचा सिलेंडरवर खूप मोठा दाब असतो.

त्यामुळे सिलेंडर टाकी तयार केल्यानंतर वारंवार रिफिल करण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस वापरता येईल याची एक काल मर्यादा ठरवलेली असते. या अधिकतम कालावधीस एक्सपायरी डेट म्हणतात.

ही काल मर्यादा A. (जाने. फेब्रु. माचे) B. (एप्रील मे जून) C. (जूलै आगष्ट सप्टें) D. (ऑक्टो नोव्हे डिसें) असे गट व पुढे वर्ष अशी असते. सिलेंडरच्या टाकीवर वरच्या तीन पट्याच्या अतिल एका पट्टीवर सिलेंडरची एक्सापायरी डेट नोंदवलेली असते.

उदा. जर ती काल मर्यादा ए १७ अशी असेल तर तो सिलेंडर मार्च २०१७ पर्यंत वापरासाठी सुरक्षित आहे असे समजावे. आपल्या घरी नवीन सिलेंडर घेताना त्यावरील एक्सपायरी डेट पाहून घ्यावी. एक्सपायरी संपलेला सिलेंडर घेऊ नये.

🔴 प्रश्न: गॅस सिलेंडरचा नुकसानी अपघात किंवा स्फोट झाल्यास विमा सरंक्षण असते का?
🟢 उत्तर: आपण जेव्हा गॅस सिलेंडरची रक्कम भरतो त्यातील काही रक्कम ही गॅस कंपनीकडून सिलेंडरच्या स्फोटामुळे होणाऱ्या सांभाव्य दुर्घटनेतील नुकसान भरपाईचा विमा म्हणून विमा कंपनीकडे भरलेली असते.

यास सार्वजनिक दायीत्व पॉलीसी म्हणतात. त्यामुळे अशा दुर्घटनेतून होणारी नुकसान भरपाई ग्राहक गॅस कंपनी कडे मागू शकतो. योग्य त्या प्रक्रियेनंतर गॅस कंपनी जर गॅस कंपनी जबाबदार ठरत असेल तर अशी नुकसान भरपाई मिळू शकते.

हे वाचले का?  office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006

ही मर्यादा मालमत्ता नुकसानीच्या बाबतीत अधिकतम ४० लाख आहे. तसेच मृत्यू दुर्घटनेच्या बाबतीत अधिकतम ५० लाख रूपये इतकी आहे.

🔴 प्रश्नः सिलेंडर जोडणीचा / ग्राहकांचा मालकी हक्क बदलू शकतो काय ?

🟢 उत्तर: होय चालू ग्राहकांच्या मृत्यू नंतर काही कागदपत्रांच्या पूर्तते नंतर ग्राहकांच्या एका वारसाच्या नावे जोडणीचा मालकी हक्क घेता येतो. तसेच आपल्या कुटुंबातील नात्यामध्येही ना हरकत व अन्य कागदपत्राच्या पूर्ततेनंतर गॅस जोडणीचा मालकी हक्क बदलता येतो.

🔴 प्रश्न: आपल्या घरी गॅस कंपनी किंवा एजन्सीचे कर्मचारी तपासणी येतात व फार मोठी रक्कम आकारतात. यावर उपाय काय ?

🟢 उत्तर: प्रत्येक ग्राहकांनी किमान दोन वर्षातून एकदा गॅस शेगडी, रबरी ट्यूब, रेग्युलेटर यांची तपासणी करून घेणे हे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे.

परंतु जेव्हा गॅस कंपनीचे लोक तपासणी साठी घरी येतात तेव्हा त्यांचे आय कार्ड, तपासणी अधिकार पत्र याची विचारणा करावी. गॅस एजन्सी कडे फोन करून ते अधिकृत प्रतिनिधी आहेत काय ? याची खात्री करून घ्यावी.

ते जर अधिकृत असतील तरच त्यांना तपासणी करू द्यावी. तपासणी नंतर शेगडी दुरूस्ती, रबर ट्युब बदलणे किंवा इतर किरकोळ दुरूस्ती यांची एकूण किती रक्कम आकारले त्याचे बील घ्यावे. त्यांना रोख पैसे देऊ नयेत.

हे बील जेव्हा ग्राहक पुढच्या वेळेचा सिलेंडर भरून घेईन त्यावेळसच्या एकूण बील आकारणीत आकारण्यात येईल तेव्हा चुकते करावे. त्यामुळे दुरूस्ती प्रतिनिधीनी ग्राहकांना काय सेवा दिली व त्याचे शुल्क किती आकारले यांची अधिकृत नोंद राहते व ग्राहकांची लुबाडणूक होत नाही.

ऑइल आणि गॅस खात्याने यासाठी वरील प्रमाणे नियमच केलेला आहे.

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Gas Consumer Rights

2 thoughts on “Gas Consumer Rights एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार”

  1. Yogesh Kulkarni

    एक जोडणीवर दोन गॅस सिलिंडरअसतील तर त्यांना रेशन कार्डवर रेशन मिळते का?

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top