काय आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना(Abhay Yojana)

Abhay Yojana

Abhay Yojana आपल्या विविध मालमत्ता तसेच अन्य व्यवहारात मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले असेल आणि अशा दस्तांचे नियमितीकरण करावयाचे असेल तर आपल्याला ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ चा लाभ घ्यायला हवा.

या योजनेमुळे सवलतीत दस्तांचे नियमितीकरण करुन आपल्या दस्तांना पुरावा मूल्य प्राप्त होऊन आपण निश्चिंत होऊ शकता.

मालमत्ताधारक तसेच गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारक, विविध कंपन्या , भागिदार संस्था अशा विविध घटकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शिवाय इमारतींच्या, घरांच्या पुनर्विकासाचे अडथळे दूर होणार आहेत.

Abhay Yojana स्वरूप

कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांचे नियमित करण्यासाठी ही योजना आहे. त्यासाठी कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठ्या प्रमाणात सुट दिली आहे.

१) दि.०१ जानेवारी, १९८० ते दि.३१ डिसेंबर २००० या कालावधीत निष्पादित दस्तांपैकी ज्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल; अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ व दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ.

हे वाचले का?  PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत

योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया

२) कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर, मुद्रांक शुल्कामध्ये ५०% सुट व त्यावरील दंडाची रक्कम संपूर्ण माफ.

३) दस्त जर दि.०१ जानेवारी २००१ ते दि.३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित केला असेल तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५% पर्यंत सुट व दंड नाममात्र २५ लाख ते १ कोटी रूपयांच्या मर्यादेतच वसुल करण्यात येईल. त्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम संपूर्णपणे माफ.

Abhay Yojana कालावधी

योजनेचा कालावधी हा दि.३१ मार्च, २०२४ पर्यंतच मर्यादित आहे. योजना दोन टप्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

पहिला टप्पा- दि.०१ डिसेंबर २०२३ ते दि. ३१ जानेवारी, २०२४.

दुसरा टप्पा -दि.०१ फेब्रुवारी, २०२४ ते दि.३१ मार्च, २०२४.

काही कारणास्तव पहिल्या टप्प्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील अर्ज करण्याची मुभा आहे. परंतु लाभ कमी प्रमाणात मिळेल.

हे वाचले का?  Deshi Cow Anudan Yojana राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय, देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना |

नियमितीकरणाचे आवाहन

मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये सुट व माफी देऊन देखील स्वतः पुढाकार घेऊन मालमत्तेच्या हस्तांतरणावरील कमी भरलेले मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा न केल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर मुद्रांक कायद्याच्या कलम ४६ नुसार कारवाई करण्याच्या सूचनाही शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

तसेच मुद्रांक कायद्याच्या कलम ५९ व कलम ६२ नुसार दिवाणी-फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत.

नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा व कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काचे सर्व व्यवहार तातडीने रेग्युलराईज करुन घ्यावे.

योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया

विशेष कक्ष स्थापन

मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महा निरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

तसेच अर्जदारांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच, सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

हे वाचले का?  Pink Rickshaw Scheme For Women महिलांना मिळणार अनुदान | "पिंक (गुलाबी) ई-रिक्षा" योजना सुरू | GR आला | पहा पात्रता, आवश्यक कागदपत्रे |

योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशने परिपत्रक-मुद्रांक अभय योजना या सदराखाली नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

या संदर्भातील अडी अडचणी व शंका निरसनासाठी संबंधित जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कॉल सेंटर क्र.८८८८००७७७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top