Ayushman Bharat Health Insurance आयुष्यमान भारत योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात २५ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आली आहे. २०११ सारी झालेल्या आर्थिक सर्व्हेतील गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड काढणे आवश्यक आहे. हे कार्ड काढल्यानंतर लाभार्थी व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत 2022 साली झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात नोंद झालेल्या गरीब कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले आहे. पात्र कुटुंबांची गाव निहाय यादी सरकारने तयार केली असून या यादीनुसार जे पात्र लाभार्थी असतील ते आपले आयुष्यमान भारत कार्ड काढू शकतात.
Ayushman Bharat Health Insurance पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत:
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार हे मोफत दिले जाणार आहेत. सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्र करून या योजनेतील लाभाची मर्यादा वाढविली. त्यामुळे लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे मोफत मिळणार आहेत.
साडेतीन लाख जणांना आयुष्यमान भारत कार्ड:
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे आरोग्य कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कॅम्प देखील घेण्यात आले होते.
Ayushman Bharat Health Insurance हेल्थ कार्ड कुठे काढता येते?
ज्या व्यक्तींना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड बनवणे बनवायचे आहे, त्या व्यक्तींनी आपल्या जवळील सेतू केंद्रा जवळील आरोग्य केंद्र किंवा ग्रामपंचायत मध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावे.
तेथे जाऊन आपले आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढता येते.
त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात असलेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या कक्षाच्या वतीने गावोगावी आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्ड काढून देण्यासाठी विविध कॅम्पचे आयोजन केले जात आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- आयुष्यमान भारत योजना लेटर
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- तसेच मोबाईल नंबर
हॉस्पिटल ची यादी पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: पहा अर्ज, पात्रता व आवश्यक कागदपत्रे…
- Tribal Development Education Schemes आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ;उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी
- Pandit Dindayal Swayam Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना- आवश्यक कागदपत्रे | पात्रता | असा करा अर्ज |
- Foreign Scholarship Scheme परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया काय आहे योजना |
- Ustod Kamgar Yojana ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’
- Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना | आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून
Pingback: Startup Loan नवकल्पनांना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत भांडवल | नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन