Birsa Munda Krushi Kranti Yojana बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना संपूर्ण माहिती |

Birsa Munda Krushi Kranti Yojana

Birsa Munda Krushi Kranti Yojana अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पुढील बाबींवर अनुदान देण्यात येते.

Birsa Munda Krushi Kranti Yojana जलसिंचनावर शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान खालील प्रमाणे आहे:

  • नवीन विहीरीसाठी 2 लक्ष 50 हजार रुपये,
  • जुन्या विहीरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये,
  • इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये, वीज जोडणी आकार 10 हजारु रुपये,
  • शेततळयाच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लक्ष रुपये,
  • सुक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचनासाठी 50 हजार रुपये आणि तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपये,
  • पारसबागेसाठी 500 रुपये,
  • 10 अश्वशक्तीपर्यंतच्या पंप संचाकरीता (डिझेल/विद्यूत) 20 हजार रुपये,
  • पिव्हीसी/एचडीपीई पाईकरीता 30 हजार रुपये
हे वाचले का?  MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची 'आवडेल तिथे प्रवास योजना'!!!

येथे पहा अर्ज कुठे करावा?

पुढील तीनपैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थ्यास घेता येतो.

१. नवीन विहीर पॅकेज:

नवीन विहीर पॅकेजमध्ये नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग.

२. जुनी विहीर पॅकेज:

जुनी विहीर पॅकेजमध्ये जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग.

३. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज:

शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकणामध्ये शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप व परसबाग याचा समावेश आहे.

४. ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी यापुर्वीच योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबाग यासाठी अनुदान देता येते.

वरील घटकांपैकी काही घटक शेतकऱ्यांकडे असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील घटकांची निवड करावी.

वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग. पुर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी या बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana 4th installment लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! दिवाळी गोड होणार | 'या' दिवशी होणार खात्यात पैसे जमा |

येथे पहा अर्ज कुठे करावा?

लाभाथी पात्रता –

लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

या प्रवर्गातील शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे.

नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.

तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थ्यांच्या सातबारावर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीरीचा लाभ देता येणार नाही.

नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरावर दुसरी विहीर नसावी.

नवीन विहीरी व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.

0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास व त्यांची जमीन 0.40 हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ देता येईल.

हे वाचले का?  जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला

6 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील. मात्र दारिद्रय रेषेखालील लाथार्थ्यांना ही अट लागू नाही.

परंपरागत अथवा निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वन पट्टेधारक शेतकऱ्याला प्राधान्य राहील.

येथे पहा अर्ज कुठे करावा?

आवश्यक कागदपत्रे –

  • सातबारा,
  • 8-अ उतारा ,
  • आधारकार्ड,
  • तहसिलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला,
  • नवीन विहीरीच्या बाबतीत भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला
  • जातीचा दाखला
  •  या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top