Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

Educational Loan

Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना ही राज्य सरकारची योजना असून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येते. या योजने मार्फत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळा मार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळते. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना पात्रता:

  • शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू इच्छिणारा अर्जदार अल्पसंख्यांक असावा.
  • अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला असावा.
  • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 18 ते 32 वर्ष असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख.

योजनेचे स्वरूप:

या योजनेत कर्जाची मर्यादा रुपये 7 लाख 50 हजार पर्यंत आहे. Education loan interest rate या योजनेचा व्याज दर फक्त 3 टक्के आहे. कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परत फेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढच्या पाच वर्षांपर्यंत करता येते.

हे वाचले का?  स्टॅम्प पेपर Stamp Paper घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..!

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती
  • अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा(आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पासपोर्ट/बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/लाईट बिल किंवा तलाठी किंवा तहसीलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र- यापैकी एक)
  • ओळखपत्र- अर्जदार व जामीनदार दोन्हींचे (आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पासपोर्ट/बँक पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक).
  • उत्पन्न दाखला: कुटुंबप्रमुखाच्या नावे तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नंबर 16.
  • विहित नमुन्यातील अर्जदार, जामीनदाराचे हमीपत्र.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

  • महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथ पत्र
  • जामीनदार सक्षम जामीनदार किंवा स्थावर मालमत्ता असल्यास गहाण अथवा जंगम मालमत्ता असल्यास तारण गहाण करून घेणे
  • शैक्षणिक संस्थेचे शुल्क पत्र वसतिगृह किंवा घर मालकाचे भाडे पत्र व मेसचे दर पत्रक
हे वाचले का?  Krushi Mitra Karj Yojana कृषी मित्र कर्ज योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज…..!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

College Original Documents देत नाही काय करावे येथे पहा

हे वाचले का?

  1. Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
  2. Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
  3. office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
  4. Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
  5. Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top