योजना क्रमांक –4 अनु-सूचित जातीतील ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणाकरिता अनुदान देणे.
योजनेचा उद्देश –
ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात. नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.
लाभार्थी योजनेस पात्र होण्याचे निकष-
- लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
- लाभार्थी संगणक परीक्षा उत्तिर्ण झालेली असावी.
- लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटूंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 120,000/- पर्यंत असावे.
- लाभार्थी अनु-जातीतील असल्याचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक
- अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
योजना क्रमांक –5 माझी कन्या भाग्यश्री योजना.- सुधारीत
योजनेचा उद्देश –
- मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे.
- एक किंवा देान मुली असणा-या कुटूंबाना मुलींच्या नांवे वैयक्तिक लाभ (रु. 50,000/- किंवा रु. 25,000/-)
माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेच्या अटी व शर्ती.
- ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापर्यंत आहे अशा सर्व घटकातील लाभार्थ्यासाठी ही योजना लागू आहे.
- 1 ऑगस्ट 2017 नंतरची पहिली व दुस-या अशा देान्ही मुली लाभास पात्र राहतील.
- दि. 1 ऑगस्ट 2017 नंतरची एकच मुलगी आहे. व मातेने/पित्याने दोन वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा मुलीस रक्कम रु. 50000/- चे मुदत ठेव प्रमाणपत्र देय राहील.
- दि. 1 ऑगस्ट 2017 नंतर दोन मुली आहेत. व एक वर्षाच्या आत माता/पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा प्रत्येक मुलींस रु. 25000/- चे मुदत ठेव प्रमाणपत्र देय राहील.
- प्रथम जुळया मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास सदर देान्ही मुलींना प्रत्येकी रु. 25000/- लाभ देय राहील.
- लाभार्थी कुटूंबाने लगतच्या वर्षाचा रक्क्म रुपये 8.00 लाखपर्यतचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी (अधिवास) दाखला स्थानिक तहसिलदार यांचा सादर करणे आवश्यक राहील.
- माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेचे अर्ज नजीकचे अंगणवाडी केंद्रात प्राप्त होऊ शकेल.
- योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलींचे वय 18 वर्षै पुर्ण होणे तसेच तिने 18 वर्षे पुर्ण होईपर्यत अविवाहित असणे आवश्यक राहील.
इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण घटक), ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे. ग्रामीण भागातील अनु-सूचित जातीतील इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना) व माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनांच्या निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थांनी योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत.
उपरोक्त योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत देण्यात येत असून अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Abhay Yojana 2023 व्यापार्यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्य कर विभागाची अभय योजना २०२३
- CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार |
- Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.
- Lpg Cylinder Accident Insurance घरगुती गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळतो 50 लाख रुपयांपर्यंत विमा कवच |
- Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |
- Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा