Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी |

Madh Kendra Yojana

Madh Kendra Yojana महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना शासनाने सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

Madh Kendra Yojana प्रमुख घटक आणि पात्रता :

1)   वैयक्तिक मधपाळ : या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते.

2)  वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) : या योजनेसाठी किमान 10 वी पास, वय वर्षे 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थींकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

हे वाचले का?  Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये............!!!!!

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेची वैशिष्ट्ये :

या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे.

शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते.

मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

अटी व शर्ती :

 लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील.  मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

          या योजनेच्या अधिक माहितीसाठी उस्मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (द्वारा – जिल्हा उद्योग केंद्र), प्रशासकीय इमारत समोर,  (दूरध्वनी क्रमांक : 02472- 222301)  उस्मानाबाद – 413501 ई-मेल आयडी : dviosman@rediffmail.com येथे संपर्क साधवा. तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला नं.5, महाबळेश्वर, जिल्हा- सातारा, पिन : 412806 (दुरध्वनी : 02168-260264) यांच्याशी संपर्क साधावा.

हे वाचले का?  Divyang Scheme दिव्यांग व्यक्तींना मिळणार 'फिरत्या वाहनावरील दुकान' | असा करा अर्ज |

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Crop Insurance अशी मिळवा शेताच्या नुकसानीची भरपाई |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top