EPFO Rules कधी काढता येतात पीएफ चे पैसे? किती मिळतात पैसे? बघू या सोप्या पद्धतीने |

EPFO Rules

EPFO Rules कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नंतरच्या उपयोगासाठी भविष्य निर्वाह निधी असतो. परंतु काही अडचणींमुळे त्यातून पैसे काढण्याची वेळ येते.

व्यक्तीच्या नोकरीच्या काळापर्यंत ईपीएफ खात्याची मुदत असते. जर संजय एखादी व्यक्ति वयाच्या 28 व्या वर्षापासून 58 वर्षापर्यंत नोकरी करत असेल तर तो कार्यकाल 30 वर्षांचा होतो.

या 30 वर्षांच्या कालावधीत जि व्यक्ति नोकरीला लागलेली असते त्या व्यक्तिला स्वत:चे लग्न, मुलांचे शिक्षण, स्वतःचे घर, अशा अनेक जबाबदार्‍या पार पदव्या लागतात. या सर्व गोष्टी आर्थिक व्यवहारा सोबत निगडीत आहेत.

अशा परिस्थितीत अडचणी च्या काळात त्याने स्वत: जमवलेले पैसे उपयोगी आल्याचे समाधान त्या व्यक्ति ला मिळते.

ईपीएफ खात्यातून पीएफ खाते धारकाला पैसे काढत येतात.

EPFO Rules ईपीएफ मधून पैसे काढण्याची कारणे:

1. वैद्यकीय उपचार खर्च:

हे वाचले का?  Retirement Planning असे करा, म्हातारपण सुखात घालवा |

ईपीएफ धारक खातेदारास ईपीएफ खात्यातून स्वत:साठी, पत्नी, मुलांच्या किंवा आपल्या आई वडीलांच्या वैद्यकीय खर्चासाठी खात्यातून काही रक्कम काढण्याची परवानगी असते.

भविष्य निर्वाह निधी मधून कर्मचार्‍याला आपल्या ईपीएफ खात्यामधील हिस्सा (प्रत्येक महिन्याला 12%योगदान अनुसार व्याजासह जमणारे पैसे) किंवा मासिकं वेतनाच्या सहापट रक्कम काढत येते.

2. लग्न कार्यासाठी:

कर्मचार्‍याच्या आपल्या घरात जर कोणाचे लग्न असेल तर त्या खर्चासाठी ईपीएफ खात्यातून निधी काढू शकतो.

लग्नाच्या खर्चासाठी जर कर्मचार्‍याला रक्कम काढायची असेल तर नोकरीची कमीत कमी 7 वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजे. ईपीएफ खात्यातून कर्मचाऱ्याला जमा असलेल्या निधी पैकी 50% रक्कम काढत येते.

3. नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी:

जर कर्मचाऱ्याला नविन घर खरेदी करायचे असेल किंवा घर बांधण्यासाठी जागा घ्यायची असेल किंवा घेतलेल्या जागेवर नवीन घर बांधायचे असेल तर आपल्या ईपीएफ खात्यातून पूर्ण नोकरीच्या कालावधीत एकदाच पैसे काढत येतात.

हे वाचले का?  सोन्यासारखा फायदा मिळवून देणारी योजना | Sovereign Gold Bond Scheme

घर घेणे किंवा नवीन घर बांधण्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या ईपीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येते.

पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला कमीत कमी 5 वर्षे नोकरी पूर्ण केलेली पाहिजे.

घरासाठी पैसे काढताना घर हे कर्मचार्‍याच्या किंवा जोडीदारासह संयुक्तपणे नावावर असावे लागते.

4. घराच्या नुतनीकरण किंवा पुनर्बांधणीसाठी:

घराच्या पुनर्बांधणीसाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी मधून रक्कम काढायची असेल तर घर कर्मचार्‍याच्या स्वत:च्या किंवा जोडीदारासह संयुक्तपणे नावावर असणे आवश्यक आहे. भविष्य निर्वाह निधीतून कर्मचारी त्याच्या मासिक वेतनाच्या 12 पट रक्कम काढू शकतो. कर्मचाऱ्याला पैसे काढणयासाठी कमीत कमी 5 वर्षे नोकरी केलेली पाहिजे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Bank Rules 1 ऑक्टोबर पासून बदलणार हे नियम | बघा संपूर्ण माहिती |

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top