Farmer ID शासनाकडून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. परंतु पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना Farmer ID म्हणजेच ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे असा नवीन नियम करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ॲग्री स्टेप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक व ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता आधार लिंक करणे गरजेचे आहे. तसेच शेतकरी ओळख क्रमांक हे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन फार्मर आयडी साठी नोंदणी करता येते.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
farmer ID काय आहे?
शेतकरी ओळखपत्र हा एक ओळख क्रमांक आहे. शेतकरी ओलखपत्रामध्ये शेतकऱ्याच्या वैयक्तिक माहिती बरोबर शेती, पिके, जमीन तसेच इतर शेतीविषयक कामांची माहिती असते. शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या नोंदीशी जोडणारे डिजिटल ओळखपत्र म्हणजेच शेतकरी ओळखपत्र(farmer ID). सारकरकरच्या डिजिटल कृषि अभियानाचा हा एक महत्वाचा भाग आहे.
Agristack ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविण्यास मान्यता
अशी आहे नवीन अट:
24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान योजना चा 19 व्या हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक अट लागू नाही. परंतु २० व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना ओळख क्रमांक हा अनिवार्य असेल.
जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी करीत आहे, अशा शेतकऱ्यांना पती-पत्नी व अठरा वर्षाखालील मुलांची आधार नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे शेतकरी नियमांचे पालन करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा