Foreign Scholarship परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती |

Foreign Scholarship

Foreign Scholarship अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागते. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शासनाकडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना “परदेश शिष्यवृत्ती योजना” लागू करण्यात येईल.

Foreign Scholarship विद्यार्थ्यांची पात्रता –

(१) विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

(२) विदयार्थ्यांने परदेशातील क्युएस् अद्ययावत वर्ल्ड रॅकींगमध्ये २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेत खात्रीशीर व बिनशर्त प्रवेश मिळविलेला असावा.

हे वाचले का?  Krishi Yantrikaran Yojana कृषी यांत्रिकीकरण योजना…. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे……..!!!!

(३) ज्या विद्यार्थ्यांने परदेशी शैक्षणिक संस्थाकडून Unconditional offer letter मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. यासाठी Conditional offer letter गृहीत धरेल जाणार नाही.

(४) विद्यार्थ्यांने या योजनेखालील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना, त्याने यापूर्वी महाराष्ट्र शासनाची वा कोणत्याही अन्य विद्यापीठाची वा इतर कोणत्याही राज्य शासनाची वा केंद्र शासनाची वा अन्य संस्थांकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.

(५) परदेशातील विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षांचा असावा. (६) एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांस प्रवेशीत विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

हे वाचले का?  Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना....... असा करा अर्ज....

Foreign Scholarship शैक्षणिक अर्हता:

पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:-

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी.

उत्पन्न मर्यादा:-

विद्यार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याच्या स्वतःच्या उत्पन्नाराह सर्व स्रोतातून मिळणारे उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थी अविवाहीत असल्यास कुटुंबामध्ये त्याच्या पालकांचा समावेश असेल. विद्यार्थी विवाहीत असल्यास कुटुंबामध्ये पती/पत्नीचा समावेश असेल.

किती मिळेल शिष्यवृत्तीचा लाभ

एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक:-

एका कुटुंबातील एका मुलास फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

अभ्यासक्रमाचा कालावधी :-

(१) पी.एच.डी साठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षा पेक्षा कमी नसावा.

हे वाचले का?  Foreign Scholarship Scheme परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया काय आहे योजना |

(२) पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत २ वर्षापेक्षा कमी नसावा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top