मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध होणार.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना

पशुपालकांच्या दारापर्यंत पशुरुग्णांना पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, राज्यात सद्या कार्यरत असलेल्या ६५ फिरत्या पशु वैद्यकीय दवाखान्या व्यतिरिक्त “मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना” या राज्यस्तरीय योजने अंतर्गत राज्यातील ८१ तालुक्यांमध्ये नवीन फिरते पशु चिकित्सा पथक स्थापन करण्यास आली आहे.

राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी, इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि, पशुधन आजारी पडल्यास सदर पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये घेऊन जावे लागते. पशुरूग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते.

बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुरुग्णांचा मृत्यू होऊन, पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरीता उत्कृष्ट दर्जाच्या पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आहे. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये दळणवळणाच्या अपुर्या सुविधा आहेत, अशा तालुक्यांमधील पशुरुग्णांना पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी, फिरते पशु चिकित्सा पथक स्थापन करणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  Pik Vima Update 2024 आधार कार्ड व सातबारा उताऱ्यावरील नावात अल्प बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकारणार

वरील बाबींचा विचार करून राज्यातील ३४९ ग्रामीण तालुक्यांमध्ये स्थापन करावयाच्या फिरत्या पशु चिकित्सा पथकांपैकी प्रथम टप्प्यात ८० तालुक्यांमध्ये नवीन ८० फिरती पशु चिकित्सा पथके स्थापन करण्यास, तसेच सदर फिरत्या पशु चिकित्सा पथकांच्या कामाचा सर्वकष अभ्यास करून फलनिष्पत्ती विचारात घेऊन उर्वरित तालुक्यांमध्ये फिरते पशु चिकित्सा पथके निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना अंतर्गत घेतला आहे.

7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..?

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना तालुका वार  यादी
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना तालुका वार यादी

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना तालुका वार  यादी
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना तालुका वार यादी

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र  होणार

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना तालुका वार  यादी
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना तालुका वार यादी

(अ) मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेचे स्वरूप :

(१) सदर योजने अंतर्गत फिरत्या पशु चिकित्सा पथकामध्ये उपकरणांनी सुसज्ज वाहन तसेच पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी आणि वाहन चालक तथा मदतनीस (Driver cum Helper) यांचा समावेश असेल.

(२) या पथकाकरीता आवश्यक असणारी औषधे, हत्यारे व उपकरणे इत्यादी बाबी साठींचा निधी सद्या कार्यरत असलेल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांकरिता मंजूर असलेल्या लेखाशिर्षां अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल.

(३) तसेच सदर पथकाच्या वाहनासाठी आवश्यक असलेले इंधन, वाहन दुरूस्ती व देखभाल इत्यादी बाबींसाठी येणार्‍या खर्चाकरिता आवश्यक असलेला निधी सध्या कार्यरत असलेल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांकरिता मंजूर असलेल्या लेखाशिर्षांतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल.

हे वाचले का?  शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज मिळणार , राज्य मंत्रिमंडळाची घोषणा.

(४) फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची सेवा परिणामकारकरित्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने टोल फ्री क्रमांकाची सुविधा, अॅन्ड्रॉइड अॅप (कॉल सेंटर सुविधासह) उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.

शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना.

(ब) मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुवैद्यकीय सेवांचा तपशील.

सदर योजनेंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांचा तपशील सोबतच्या परिशिष्ट-ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील..

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सुविधा
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सुविधा

(क) पशुवैद्यकीय अधिकारी / कर्मचारी तसेच वाहनचालक तथा मदतनीस यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या.

सदर फिरत्या पशु चिकित्सा पथकासाठी नियुक्त करण्यात येणार्‍या पशुवैद्यकीय अधिकारी / कर्मचारी तसेच वाहनचालक तथा मदतनीस यांची कर्तव्ये व जबाबदार्‍या सोबत च्या परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील.

सावकारी कायदा Savkari Kayada 2014

(ड) उपकरणे:

सदर पथकाच्या वाहनांमध्ये प्रामुख्याने खाली नमूद केलेली उपकरणे राहतील:

(१) कास्टींग उपकरणे पशुधनाचे पाय बांधण्यासाठी दोरी, तोंड व जबडा बांधण्याचे कपडे, पशुधनास पकडण्यासाठी जाळी बसलेले जनावर उभे करण्यासाठी ट्रस अॅण्ड चेन पुली.

(२) आय/व्ही कॅन्यूला आय व्ही कॅथेटर

(३) तात्पुरता अस्थीभंग स्थिर करण्यासाठी विविध उपकरणे स्प्लीट

(४) शस्त्रक्रिया आणि इतर कार्यपध्दतीसाठी वेदनाशमक व इतर औषधे झायलेझाईन, केटामाईन, प्रोप्रोफोल, डायझेपाम, डोक्साप्रेम, योहीम्बीन, ॲटोपीन सल्फेट, सोडियम थायोसल्फेट, इंजेक्शन अर्गोमेट्रिन, इंजेक्शन पाम (PAM), इंजेक्शन कॅल्शियम ग्लुकोनेट, अॅक्टीव्हेटेड चारकोल इंजेक्शन बेरेनिल बी.पी. हॅडल, सर्जिकल ब्लेड, क्रोमिक कॅटगट, नायलॉन, सुचरींग निडल्स, स्ट्रेट + कईड, निडल होल्डर, पोव्हिडोज आयोडीन, अबझॉरबंट कॉटन,

हे वाचले का?  मंडल निरीक्षक सर्कल (Circle) भाऊसाहेब यांची कर्तव्ये.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top