Gopinath Munde Sanugrah Anudan ऊस तोडणी व वाहतूक करतांना होणारे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.
घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातात मृत्यू झालेल्या अथवा अपंगत्व आलेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमास व त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या अंतर्गत असलेल्या परंतु महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना”(Gopinath Munde Sanugrah Anudan) राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Gopinath Munde Sanugrah Anudan योजनेअंतर्गत मिळणारे लाभ :-
सदर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठी लागू राहील.
या कालावधीत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांना किंवा त्यांच्या बैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू झाला किंवा अपघातामुळे अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.
सदर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभास पात्र असणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांनी अथवा त्यांच्या वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना” या योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाही.
मोफत माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
सदर योजनेअंतर्गत पात्रतेसाठी १) रस्ता / रेल्वे अपघात २) पाण्यात बुडून मृत्यू ३) जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा ४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात. ५) वीज पडून मृत्यू ६) उंचावरून पडून झालेला अपघात (७) सर्पदंश व विंचुदंश ८) जनावरांच्या हल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू ९) बाळंतपणातील मृत्यु १०) दंगल ११) अन्य कोणतेही अपघात इ. अपघातांचा समावेश असेल.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेमध्ये १) नैसर्गिक मृत्यू २) योजना अंमलबजावणी पूर्वीचे अपंगत्व ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे ४) गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात ५) अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात ६) भ्रमिष्टपणा ७) शरीरातर्गत रक्तस्त्राव ८) बैलगाड्यांची / मोटार शर्यतीतील अपघात ९) युध्द १०) सैन्यातील नोकरी ११) जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश असणार नाही.
Gopinath Munde Sanugrah Anudan आवश्यक कागदपत्रे
१) ग्रामसेवक यांच्याकडील ऊसतोड कामगार असल्याबाबत ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र.
२) मृत्यूचा दाखला.
३) ऊसतोड कामगाराचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६. क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
४) ऊसतोड कामगाराच्या वयाची पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रांच्या आधारे वयाची ओळख खात्री होईल अशी कोणतीही कागदपत्रे.
५) प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल
६) झोपडी आणि सामुग्रीचे वस्तूंचे आग / दंगल/संप/वादळ महापूर इ. मुळे नुकसान झाल्यास नुकसानीचा फोटो, नुकसानीची यादी, पंचनामा
Gopinath Munde Sanugrah Anudan अपघात स्वरूपानुसार सादर करावयाची कागदपत्रे:
जेव्हा ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम तसेच त्यांची बैलजोडी यांच्या अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सर्व क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.
व्यवसायासाठी महिलांना मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित समाज कल्याण अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतील.
संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून पात्र असलेले प्रस्ताव संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत सादर करण्यात यावेत.
सदर समिती मार्फत मंजूर प्रस्ताव गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पाठविले जातील. त्यानुसार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ यांच्यामार्फत संबंधित अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या कुटुंबाच्या वारसदारांच्या बँक खात्यात ECS द्वारे अनुदान वाटप करण्यात येईल.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाने साखर कारखान्यांकडून रू.१० प्रति टन प्रमाणे प्राप्त होणा-या निधीतून सदर खर्च करावा.
Gopinath Munde Sanugrah Anudan वारसदार प्राधान्य क्रम:
१) मृत कामगाराची पत्नी/पती
२) मृत कामगाराची अविवाहित मुलगी
३) मृत कामगाराची आई
४) मृत कामगाराचा मुलगा
५) मृत कामगाराचे वडील
६) मृत कामगाराची सून
७) अन्य कायदेशीर वारसदार
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.