घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!

घर खरेदी सुविधा आणि सेवांची खात्री-

 घर खरेदी करण्याच्या वेळी विविध प्रकारचे विक्री करार आणि ब्रोशर्समधून संभाव्य ग्राहकाला विविध सेवा आणि सुविधांची हमी दिली जाते. मालमत्तेच्या एकूण किंमतीत या घटकांचाही सहभाग असतो. तुम्हाला ज्या गोष्टींचे आश्वासन दिले गेले आहे, त्या कितपत पूर्णत्वास पोहोचल्या आहेत याबद्दल नियमित तत्त्वावर चौकशी करत राहिल्याने अंतिम परिणाम काय असणार आहे, याची कल्पना खरेदीदाराला येण्यास मदत होते.

जमिनीसंबंधीची तसेच इतर कागदपत्रे –

सदनिकेचा ताबा मिळण्यात विलंब होऊ नये म्हणून जमिनीसंबंधीची कागदपत्रे आणि ताब्याची प्रमाणपत्रे सरकार तसेच इतर अधिकृत संस्थांकडून दिली गेली आहेत, याची खात्री करून घेतली पाहिजे.

बांधकाम सुरू असणारा प्रकल्प-

प्रकल्पाचे बांधकाम सुरू असेल तर निश्चित केलेली रक्कम आणि बांधकामाचे वेळा पत्रक, गृह योजना, घर ताब्यात देण्याची तारीख आणि बांधकाम पूर्ण होण्यास विलंब झाल्यास किंवा सदनिकेचा ताबा घेतल्यावर काही समस्या उद्भवल्यास बिल्डरचे काय कर्तव्य बनते याचा समावेश असलेले अलॉटमेंट लेटर आणि विकास करार यांची मागणी केली पाहिजे.

बांधकाम पूर्ण झालेली मालमत्ता –

 बांधकाम पूर्ण झालेले असल्यास विक्रेत्याकडे मालमत्तेचे टायटल व पझेशन आहे आणि हस्तांतरणाचे अधिकार आहेत, याची खात्री करून घ्या. मालमत्ता कर, सोसायटी, पाणी आणि विजेची बिले इत्यादी भरली गेली आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्या. सर्व संबंधित कागदपत्रे आणि मूळ अलॉटमेंट लेटर, कम्प्लीशन प्रमाणपत्र, ऑक्युपेशन प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे मूळ बिल्डरकडून मिळवल्याची खात्री करून घ्या.

  घर खरेदी करण्याआधी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये व्यवहारासंबंधी सर्व अटी व शर्ती आणि महत्त्वपूर्ण माहिती यांचा समावेश असलेला विक्री करार, किंमत योग्य आहे की नाही आणि तुमच्या अंदाजपत्रकात बसते की नाही, हे ठरवणारे सेल्स डीड यांचा समावेश आहे. तुमच्याकडे संबधित कागदपत्रे असणे हे दीर्घकाळाकरिता हितकारक ठरते.

अति घाई नकोदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खरेदी करू इच्छीत असलेल्या मालमत्तेला वारंवार भेट देणे. तुमच्या आयुष्यातील पुढील काही वर्षे तुम्ही तिथे राहाणार आहात, त्यामुळे त्या जागेला किमान २ ३ वेळा वेगवेगळ्या वेळी भेट द्या. तुम्हाला त्या जागेत काय अनुभव येतो आहे ते पाहा. तुम्ही त्या जागेला आपले घर म्हणू शकता का ? यावर आधारित वेगवेगळ्या मालमत्तांची एक प्राधान्य यादी बनवा. जागेची पाहणी करण्यास वेळ मिळाला नाही किंवा कोणाकडून दबाव येत असेल तर मालमत्ता खरेदी करण्याची घाई करू नका.

  या सूचनांचे पालन केल्यास गैरसोयींचा पूर्ण विचार होऊन तुमच्या पसंतीचे घर घेण्यास मदत मिळेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपर्सचा दर्जा आणि पारदर्शकतेवर असलेला भर वाढतो आहे. तरीही घर खरेदी करताना वर निर्देशित सर्व घटकांचा विचार करून योग्य आणि प्रतिष्ठित ब्रँडची निवड करा. कारण प्रतिष्ठित डेव्हलपरचा आश्वासन-पूर्तीमधील ट्रॅक रेकॉर्डही तितकाच सातत्यपूर्ण असेल आणि प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने आश्वासनांची पूर्तता करणे, हे त्यांच्याकरिता अत्यावश्यक असेल.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top