असे काढाल आभा आरोग्य कार्ड:
तुम्ही भारतात कुठेही राहत असाल, तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.
जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नसेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
पुढील पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा तपासून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे. आता आपला मोबाइल क्रमांक टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल. पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ क्रमांक तयार झाल्याचा मेसेज दिसेल.
हा क्रमांक ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार क्रमांक असतो तसा. हा 14 अंकी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.
आता आपल्याला आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA क्रमांक, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA क्रमांक किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढे OTP साठी कोणत्या मोबाइल क्रमांकावर OTP पाठवावा ते विचारले जाईल आधार लिंक मोबाइल नंबर किंवा ABHA नंबर लिंक मोबाइल क्रमांक. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढच्या पेज वर तुमचे ABHA क्रमांक कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
जर कार्डमध्ये काही माहिती चुकलेली असेल, तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑप्शनवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.
या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
- Schemes for Farmers शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या विविध योजना |
- जमीन NA करण्याची गरज नाही (Jamin NA karnyachi garaj nahi).
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
- ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई
- ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा