भारत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी व सरकारी योजना प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी मुख्यालयी रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना 9 सप्टेंबर 2019 GR नुसार जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदा मार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना ‘राबविण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा राज्यातील जनतेला विशेषत ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहीले जाते. याकरिता जिल्हा परिषदे मार्फत नियुक्ती केल्या जाणा-या वर्ग -३ च्या कर्मचा-यांना त्यांच्याकडून देण्यात येणा-या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी रहाणे बंधनकारक केले आहे.
त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच शिक्षकांना त्याच्या मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे. असे असताना ब-याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले सादर करून मुख्यालयी रहात असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करतात. वास्तवात संबंधित कर्मचारी मुख्यालयी रहात नाही.
त्यामुळे पंचायत राज समितीने सन २०१७-१८ तेरावी महाराष्ट्र विधानसभा, चौथा अनुपालन अहवाल, याव्दारे शासनाच्या असे निर्देशनास आणले आहे की ग्रामीण पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे.
हया बाबी विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी व रहिवासी दाखला कोणा मार्फत व कसा घ्यावा याबाबत आवश्यक त्या सूचना त्वरित देण्यात याव्यात. याकरिता ग्राम विकास, विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत संबंधित समितीने शिफारस केली
ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी शासन परिपत्रक:
पंचायत राज समितीने त्यांच्या ४ च्या अनुपालन अहवालातील प्रकरण तसेच एकोणीसाच्या अहवालातील पृ. २४ वरील केलेली शिफारस पहाता तसेच, वित्त विभागाच्या दि. ४.१०.२०१६ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली अट विचारात घेता जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक शिक्षक व संबंधीत आरोग्य कर्मचारी मुख्यालयी रहाण्यासाठी ठोक उपाय योजना करणे आवश्यक आहे.
याकरिता खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येते त्याकरिता प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी, आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक मुख्यालयी रहात असल्यासंबंधी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे.
हे वाचले का?
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
- सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
GR डाऊनलोड कण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha - माहिती असायलाच हवी