Avishwas Tharav सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

sarpanch-upasarpanch avishwas tharav

sarpanch-upasarpanch avishwas tharav सरपंच उपसरपंच यांच्या वर अविश्वास ठराव कसा आणावा महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरंपच याच्यावर अविश्वास ठरावाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याच्या अविश्वास ठरावाबाबत जिल्हाधिकारी यांनी संदर्भिय पत्रान्वये मार्गदर्शन मागितले आहे. तसेच वारंवार वेगवेगळ्या जिल्हयांकडून शासनास यासंदर्भात विचारणा केली जाते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याच्या अविश्वास ठरावाबाबत त्या त्या पंचायतीच्या कोणत्याही सभेस उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क असणान्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या तीन चतुर्थांश (३/४) पेक्षा कमी नसेल इतक्या बहूमताने जर असा अविश्वास प्रस्ताव संमत करण्यात आला असेल.

येथे पहा सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

जिल्हाधिकाऱ्याने या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाव्दारे त्या अविश्वास प्रस्तावाला संगती दिली असेल तर सरपंच किंवा यथास्थित, उपसरपंच त्या पटांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे व त्यांची कार्ये व कर्तव्ये पार पाडण्याचे ताबडतोब थांबवील आणि जर तो अविश्वास प्रस्ताव सरपंचाच्या विरुध्द संमत करण्यात आला असेल तर त्यानंतर असे अधिकार कार्य व कर्तव्ये उप सरपंचाकडे विहित होतील ” असे नमूद करण्यात आलेले आहे.

हे वाचले का?  ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

परंतु सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीच्या मुदत समाप्त होण्याच्या दिनांकाच्या लगतपूर्वीच्या सहा महिन्याच्या आत असा कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाणार नाही.

येथे पहा सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

sarpanch-upasarpanch avishwas tharav सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहे

1. ग्रामपंचायत सुधारणा अधिनियमामध्ये सरपंच निवडणूकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाणार नाही. तथापि सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ग्रामपंचायत निवडणूका हया मुदत संपण्याच्या अगोदर एक ते दोन महिने होत असतात.

त्यानंतर मुदत संपण्याच्या दिनांकालगतच्या नंतरच्या तारखेस प्रथमसभा होवून सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाळ सुरु होतो, त्यामुळे अविश्वास ठरावाबाबत दोन वर्षाच्या कालावधीची गणना करताना सरपंच/उपसरपंच हा त्याने पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून गणना करण्यात यावी.

२. सरपंच / उपसरपंच यांचेवर दाखल अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना तहसिलदार यांचेकडे अविश्वास ठरावाची नोटिस दाखल झाल्यानंतर सात दिवसांच्या आत यापूर्वी अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपध्दतीने ग्रामपंचायत सदस्यांची सभा सबंधित तहसिलदार यांनी बोलविण्यात यावी.

सदर विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्यास तहसिलदार यांनी तसा अहवाल त्याच दिवशी अथवा लगतच्या दिवसापेक्षा अधिक होणार नाही (सुट्टीचा दिवस वगळून) या कालावधीत जिल्हाधिकारी यांचेकरं सादर करावा.

हे वाचले का?  Gram Vikas Nidhi गावाच्या विकासासाठी किती प्रकारचे निधी उपलब्ध असतात?

येथे पहा सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

3. जिल्हाधिकारी यांनी अविश्वास ठराव संमत आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगतच्या दिवसापेक्षा उशीर होणार नाही या कालावधीत विशेष ग्रामसभा आयोजण्याचे आदेश काढावेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशाच्या दिनांकणतून दहा दिवसाचे आत गट ब पेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या अधिकान्यामार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे.

4. विशेष ग्रामध्ये सरपंच, उपसरपंच यांचेविरुध्द झालेल्या अविश्वास ठरावाला संमती देणे हा एकच विषय असावा.

5. विशेष ग्रामसभेची नोटिस ही कमीत कमी गुर्ण तीन दिवस अगोदर बजावण्यात यावी. (नोटिसीचा दिनांक व बजावल्याचा दिनांक यासह). सदरची नोटिस बजावताना ग्रामपंचायत सचिव यांनी सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना नोटिस बजावण्याच्या पध्दतीने (सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाच्या ठरावाविरुध्द नियम, १९७५ च्या नियम २ब नुसार) तर ग्रामपंचायत मतदार यांचेकरीता गावाचे ग्रामपंचायत कार्यालय, जाहिर दंबडी याव्दारे प्रसिध्दी देवून प्रसिध्द करावी.

हे वाचले का?  घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top