ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी | Bandhkam Parvana Gram Panchayat

Bandhkam Parvana Gram Panchayat

Bandhkam Parvana Gram Panchayat- प्रत्येकाचे एक स्वप्न असते की स्वत:चे एक छानसे टुमदार घर असावे पण या स्वप्नातील मोठा अडथळा असतो तो म्हणजे बांधकाम परवानगी कारण बांधकाम परवानगी नसेल तर असे बांधकाम हे अनधिकृत समजण्यात येते.

आज आपण या लेखात बघणार आहोत की ग्रामीण भागातील व ग्रामपंचायत हद्दीतील घरांचे किंवा व्यवसाईक दुकान यांचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी लागणारी बांधकाम परवानगी ग्रामपंचायत कडून कशी मिळवावी हे समजून घेऊया कारण माहिती असायलाच हवी.

Bandhkam Parvana Gram Panchayat-

ग्रामीण भागातील बांधकामा करता आता बांधकाम परवानगी देण्याची अधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे पण बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये हा संभ्रम होता की बांधकाम परवानगी जर द्यायचे असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे, बांधकाम परवानगी माघणारे नागरिकांकडून कोणती कागदपत्रे मागायला हवी बांधकाम परवानगी देत असताना कर म्हणून जी काही रक्कम जमा करायचे आहे त्या संदर्भाचे दिशा निर्देश आता महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व ग्रामपंचायतींना हे दिले आहेत.

18 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने हे परिपत्रक काढले आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आता दिशा निर्देश दिले आहे की ग्रामीण भागातील इमारत बांधकाम परवानगी अधिकार हे आता ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील इमारत बांधकाम बांधकामाबाबत बांधकाम परवानगी चे निकष UDPCR Act 2020 (UNIFIED DEVELOPMENT CONTROL AND PROMOTION REGULATIONS FOR MAHARASHTRA STATE) निश्चित केले आहे. या UDPCR Act 2020 त्यामधील तरतुदी.

हे वाचले का?  तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam)

ग्रामीण क्षेत्रातील घर बांधणी परवानगीचे अनुषंगाने सर्व नियमावली युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रोमोशन रेगुलेशन मधील खंड क्र. 2 2.1.2 (XV) येथील तरतुदीनुसार 155 चौरस मीटर ते 300चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील ग्रामपंचायत कडे मिळेल. या परवानगी देत असताना दोन मुख्य गोष्टींचा विचार केल्या जाणार आहे तो म्हणजे 1. कमी जोखीम श्रेणी (Low Risk) आणि 2. मध्यम जोखीम श्रेणी (Moderate Low Risk)

1. कमी जोखीम श्रेणी (Low Risk)- 150 चौरस मीटर (१.५ गुंठा) पर्यंत भूखंड क्षेत्रावर इमारत बांधकाम तर

2. मध्यम जोखीम श्रेणी (Moderate Low Risk)- 150 चौरस मीटरपेक्षा (१.५ गुंठा) अधिक भूखंड क्षेत्रावरील इमारती 300 चौरस मीटर (3 गुंठा) पर्यंत बांधकाम.

आपण जी कमी जोखीम श्रेणी (Low Risk) मध्ये कोण कोणते आणि  मध्यम जोखीम श्रेणी (Moderate Low Risk) मध्ये कोण कोणते बांधकाम येतात ते आपल्याला परवानगी घेण्यासाठी त्यासंबंधी जी काही कागदपत्रे लागतात त्याची माहिती आपण पाहूया त्यासंबंधी बांधकाम परवानगी देण्यासाठी 150 चौरस मीटर ते 300 चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील गावठाण इमारत बांधकाम करिता अर्जदारा कडून खालील कागदपत्रांची पुरतता करणे आवश्यक ते खालील प्रमाणे.

बांधकाम परवानगी आवश्यक कागदपत्रे-

  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. जागेच्या मालकीची कागदपत्रे.
  3. मंजूर लेआऊट (Plan Layout).
  4. बिल्डींग प्लान (P- Line सहित).
  5. विकास शुल्क व कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याची पावती.
  6. आर्किटेचेरचा विहित नमुन्यातील दाखला.

बांधकाम परवानगी कर (Tax)-

i ) विकास शुल्क-

विकास शुल्क हे नगरविकास विभाग, MRTP Act- 1966 खंड 124 (B) नुसार

हे वाचले का?  ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश GR

अ) जमीन विकास शुल्क-

  1. रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडीरेकनर दर प्रती चौ. मी दरच्या 1/2%                                                                         
  2. व्यवसाईक बांधकाम- रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडरेकनर दर प्रती चौ. मी दरच्या 1%.

आ) बांधकाम विकास शुल्क-

  1. रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडीरेकनर दर प्रती चौ. मी दरच्या 2%                                                                        
  2. व्यवसाईक बांधकाम- रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडरेकनर दर प्रती चौ.मी दरच्या 4%. 

आपल्याला एकूण भरावे लागणारे विकास शुल्क= जमीन विकास शुल्क+ बांधकाम विकास शुल्क

वरील विकास शुल्क आपल्याला ग्रामपंचायतीकडे ग्रामनिधी मध्ये जमा करून त्याची नोंद करून पावती घ्यावी व त्याची स्वतंत्र नोंद झाली क याची खात्री करून घ्यावी. आता मित्रांनो हे झालं विकास शुल्क बाबत आता यापुढे जाऊन आपल्या कडून अजून एक नवीन टॅक्स ग्रामपंचायत कडून घेतल्या जाणार त्याचं नाव आहे कामगार उपकर

ii ) कामगार उपकर-

तो म्हणजे उद्योग ऊर्जा व कामगार गणेश शासन निर्णय क्रमांक 17/06/2010 व 21/07/2011 अन्वये बांधकाम उपकर= बांधकामाची किंमत 1% ( बांधकाम किंमत= बांधकाम क्षेत्र चौ.मी रेडीरेकनर दर प्रति चौ.मी).

हे वाचले का?  ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha

आपण आज या लेखात बघितले की बांधकाम परवानगी करता ग्रामपंचायत मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे व आपल्याला भरावा लागणारा टॅक्स या संबंधित सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण केला आहे लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

आपण जर श हरी भागातील रहिवासी असाल आणि नगर परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिका यांच्या हद्दीतील परवाना कसा काढावा या विषयी जर माहिती हवी असेल तर पोस्ट खाली कमेंट करावी आपणासाठी पोस्ट तयार केली जाईल.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Bandhkam Parvana Gram Panchayat व्हिडीओ पहाण्यासाठी खालील क्लिक करा

1 thought on “ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी | Bandhkam Parvana Gram Panchayat”

  1. Pingback: जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती | Jantetun Sarpanch Nivadnuk | - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top