Income Tax तुम्ही कमावलेल्या तुमच्या कमाई वर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. तुमच्या उत्पन्नावर तुम्हाला आयकर आकारला जातो. यामध्ये पगाराव्यतिरिक्त भांडवली नफा, तुमचे साइड बिझिनेस, तुमच्या बचती मधून मिळणारे व्याज, घरातून मिळणारी कमाई याचा देखील समावेश आहे.
काही असे उत्पन्न स्त्रोत आहे की ज्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही, तसेच इतर स्त्रोत आहेत, ज्यावर कर भरावा लागत नाही. आयकर कायद्याच्या कलम 10 मध्ये अशा उत्पन्न स्त्रोतांचा उल्लेख आहे.
2023 च्या अर्थसंकल्पात कर प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींचे उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना कार भरावा लागत नाही. पूर्वी ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत होती. परंतु आता ती वाढवण्यात आली आहे. पगारदार व्यक्तींना याचा फायदा होतोच.
Income Tax खालील स्त्रोतातून मिळणाऱ्या कमाईवर इन्कम टॅक्स नाही :
1. शेतीतून मिळणारे उत्पन्न:
भारत हा कृषि प्रधान देश आहे. आयकर कायदा 1961 मध्ये, कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न हे कर मुक्त ठेवण्यात आले आहे. ज्यांच्या कडे शेती आहे आणि ते शेतीतून लाखो रूपयांचे उत्पन्न घेत असतील तरी त्यांना मिळालेल्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
2. बचत खात्यावरील व्याज:
बँकेमध्ये काही व्यक्तींनी एक ठराविक रक्कम बचत महणून ठेवलेली असते. त्यावर प्रत्येक 3 महिन्यांनी व्याज मिळते. तीही एक प्रकारची कमाईच झाली. आयकर कायद्यानुसार हे एक प्रकारचे उत्पन्न च आहेे.
आयकर कायद्याच्या कलम 80 TTA नुसार या उत्पन्नावर तुम्हाला करातून सूट मिळू शकते. जर बचत खात्यावरील व्याज हे 10,000 रूपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल.
3. VRS वर मिळालेली रक्कम:
एखाद्या व्यक्तीने स्वेच्छा निवृत्ती घेतली तर स्वेच्छा सेवानिवृत्ती योजने(VRS-Voluntary Retirement Scheme)अंतर्गत काही रक्कम मिळते . प्राप्तिकर कायद्याच्या नियम 2 BA नुसार VRS अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मिळालेली रक्कम कर मुक्त असते.
4. शिष्यवृत्ती, पुरस्कार:
आयकर कायद्याच्या कलम 10(16 ) नुसार शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार मिळालेली रक्कम कार मुक्त असते. जर एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती म्हणून काही रक्कम मिळाली असेल आणि त्यावर तो त्याच्या अभ्यासाचा खर्च भागवत असेल तर अशा वेळी त्यावर कर भरावा लागत नाही.
5. ग्रॅच्युईटी कर सूट:
केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचार्याला मिळणारी ग्रॅच्युईटी ही पूर्णपणे कर मुक्त असते. परंतु जर एखादी व्यक्ति खासगी क्षेत्रात काम करत असेल आणि त्या व्यक्तिला token of appreciation मिळते, तर यासाठी वेगळे नियम आहेत.
6. हिंदू अविभक्त कुटुंबाकडुन मिळालेली रक्कम:
आयकर कायद्याच्या कलम 10(2) अंतर्गत हिंदू अविभक्त कुटुंबांकडून मिळालेली रक्कम किंवा वारसा स्वरूपात जि काही मिळत असेल ती करमुक्त आहे.
आयकर कायद्याच्या कलम 10(2) नुसार स्थावर मालमत्तेचे उत्पन्न , कुटुंबाचे उत्पन्न तसेच हिंदू अविभक्त कुटुंबाची जि वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्यावरील उत्पन्न हे करमुक्त असेल. त्यावर कर भरावा लागणार नाही.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.