RD loan मुदत ठेव म्हणजेच एफडी प्रमाणे आवर्ती ठेव म्हणजे आरडी देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. एफडी मध्ये तुम्हाला एकरकमी ठेव बँकेत ठेवावी लागते, तर आरडी मध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम हप्त्या सारखी भरावी लागते.
पोस्ट ऑफिस आणि बँक दोन्ही मध्ये आरडी ची सुविधा मिळते. एफडी प्रमाणेच आरडी वर सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला पैशांची आवश्यकता भासली तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता.
अनेक बँकांमध्ये आरडी योजना सुरू असते. त्यावर तुम्हाला चांगले व्याज मिळते. ज्यावेळी तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्हाला पैसे काढता येते.
Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….
RD loan असे काढता येईल कर्ज:
पोस्ट ऑफिस मध्ये 5 वर्षांच्या आरडी खात्यावर सलग 12 हप्ते भरले तर तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध होते.
म्हणजेच कमीत कमी 1 वर्ष हप्ता भरणे आवश्यक आहे. 1 वर्षानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड ही एकरकमी करता येईल किंवा मासिक हप्त्या मध्ये ही करता येऊ शकते.
व्याज किती लागते?
आरडी ठेवी वर तुम्हाला जितके व्याज मिळते त्या पेक्षा 2 टक्के अधिक व्याज कर्जावर द्यावे लागते. सद्या पोस्ट ऑफिस मधील आरडी वर 6.5 टक्के व्याज मिळते. तुम्हाला कर्जावर 2 टक्के अधिक म्हणजेच 8.5 टक्के भरावे लागेल.
जर तुमचे कर्ज फेडले गेले नाही तर परिपक्वतेच्या वेळेस व्याजासह होणारी रक्कम तुमच्या आरडी ठेवी मधून कापून घेतली जाईल आणि उरलेली रक्कम तुम्हाला परत मिळेल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Bank Account Zero Balance बँक खात्यात झिरो बॅलन्स असेल, तरीही पेमेंट करता येणार..?
- Startup Loan नवकल्पनांना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत भांडवल | नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप धोरण जाहीर |
- Retirement Planning असे करा, म्हातारपण सुखात घालवा |
- Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |
- Home/Flat Buying tips घर घेताय, या दहा गोष्टी तपासून घ्या!Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा