राज्यात सध्या लाडकी बहीण योजना या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार की नाही, याबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. काही ठिकाणी “मकर संक्रांतीला मोठी रक्कम खात्यात जमा होणार” अशा बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे, जे प्रत्येक नागरिकाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
⚠️Ladki Bahin January Installment लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता मिळणार का?
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट निर्णय जाहीर केला आहे.
ज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणतीही नवीन योजना सुरू करता येत नाही किंवा नवीन लाभ जाहीर करता येत नाही. तसेच, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमित स्वरूपात दिला जाणारा लाभ सुरू राहील, मात्र जानेवारी महिन्यासाठी अतिरिक्त किंवा आगाऊ स्वरूपात लाभ देण्यात येणार नाही.
महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान विकासकामे, योजना किंवा निधी वितरण करताना राजकीय प्रभाव टाळण्यासाठी हे नियम काटेकोरपणे लागू केले जातात. त्यामुळे सरकारकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम किंवा नवीन घोषणा करण्यात येणार नाही, असे आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
❓ जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार की थांबणार?
❓ योजना बंद होणार का?
❓ नवीन लाभार्थी जोडले जाणार का?
महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता अधिकृतपणे समोर आली आहेत.
📌 महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात:
✔️ नियमित लाभ सुरू राहणार
❌ नवीन किंवा आगाऊ लाभ नाही
❌ नवीन लाभार्थी निवड प्रक्रिया स्थगित
📅 निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने निर्णय
👉 ही माहिती प्रत्येक लाडकी बहीण लाभार्थी महिलांनी नक्की वाचावी आणि शेअर करावी.
राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक येथे पहा
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

