राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 हजार 888 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत.

भू विकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्ज माफी, आधारभूत किंमतीनुसार शेत माल खरेदीकरीता 6,952 कोटी रूपयांची तरतूद आणि येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगीतले. 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत शेतमळ्यांचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे.

वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देणार

  • राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय? कृषी संलग्न क्षेत्राला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.
  • यासाठी प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकी करणासाठी 950 कोटी.
  • मृद आणि जल संधारणासाठी 4,774 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
  • वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे.
हे वाचले का?  12th exam time table change बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, अॅव्हॅकॅडो, द्राक्षे फळांचा तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश करून फळ शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

पशुधन विकासासाठी देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोग शाळा विकसित केल्या जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.