Annapurna yojana या योजनेद्वारे मिळणार मोफत 3 सिलिंडर | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |

Annapurna yojana

Annapurna yojana राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता.

या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक योजना घोषणात आलेल्या आहे. यापैकी अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखाहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्याशिवाय महिलांसाठी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना लखपती दीदी सारख्या योजनांचाही सरकारने समावेश केला आहे.

Annapurna yojana अजित पवार यांचे अन्नपूर्णा योजनेबाबत मत:

अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी अन्नपूर्णा योजनेची (Annapurna  yojana) घोषणा केली आहे.अजित पवार म्हणाले की, “स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबध असतो. त्यामुळं महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे जबाबदारी आहे.”

हे वाचले का?  रु.200 मध्ये घर-जमीन नावावर करता येणार....!!

एलपीजी इंधनाचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे.त्यामुळे त्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे हे त्यावेळी म्हटले.

त्यासाठी राज्य सरकारकडून गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडायला हवा म्हणून प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचे घोषणा अजित पवारांनी केली 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ही योजना पर्यावरण संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल असेही ते म्हणाले.

Changes in Ladki Bahin yojana maharashtra मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल |

महिला मुलींवर विशेष लक्ष:

‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात राज्य सरकारने सन 2023 – 24 पासून केली आहे. त्यामध्ये मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार असे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची योजना घोषणात करण्यात आली. 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकारकडून महिना दीड हजार रुपये दिला जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण उच्च शिक्षण शिक्षणासंदर्भात ही सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज..

आरोग्य आणि इतर:

महिलांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही योजना जाहीर केल्या आहेत. त्यात राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र स्तन व गर्भाशयाच्या मुख्य कर्करोगाच्या तपासणीसाठी उपकरणे त्यासाठी 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रुग्णांची आणि विशिष्ट गरोदर माता व बालकांचे आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका सुरू करण्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली आहे.तसेच शुभमंगल सामूहिक नोंदणी कृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रूपयांवरून 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज |

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top