बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध बँकिंग, रेल्वे, LIC, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार खास प्रशिक्षण

बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध
बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध
बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध

बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार खास प्रशिक्षण विहित वेळेत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील ३० केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील ३० केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार बार्टी मार्फत ३० केंद्राच्या विस्तृत यादिसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हे वाचले का?  DOT India Recruitment दूरसंचार विभागा अंतर्गत 270 जगासाठी भरती

बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध राज्यातील ३० केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, aptitude test, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी.

दि. ०९ डिसेंम्बर २०२१ पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून ६०० असे एकूण १८ हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी ३ हजार रुपये देण्यात येतील.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

हे वाचले का?  Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026: 2 लाखांपर्यंत कर्जमाफी! कोण पात्र, कोण अपात्र? संपूर्ण माहिती

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top