Maratha Karja Yojana मित्रांनो, आज आपण आजच्या या लेखामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना यामध्ये राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनांची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अर्जदाराची पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तसेच कर्ज मंजुरी ची पद्धत काय असते? कर्जासाठी अर्ज कसा करावा? त्याच्या अर्जाचा नमुना, व अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर तसेच पत्ता व इतर अनेक गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
अशाच नवनवीन लेखासाठी आमच्या पेजला फॉलो करा व ही माहिती शेवटपर्यंत वाचा.
Maratha Karja Yojana बीज भांडवल कर्ज प्रकरणासाठीची माहिती.
- ही कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने महारोजगार या वेबपोर्टलवर आधी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
- तुम्ही जर आधीच महारोजगार वेब पोर्टल वर नोंदणी केली असल्यास लाभार्थ्यांनी त्याचे प्रोफाईल सक्रिय करून घ्यावे लागेल.
- कर्ज योजनेसाठी अर्ज भरताना Id व पासवर्ड मोबाईल वर आणि E-Mail वर प्राप्त झाल्यावर तो टाकून लॉगिन करून या कर्ज योजनेसाठी अर्ज करावयास लागेल
- अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायला हवीत. तसेच व्यवसायांवर आवश्यक परवाने लायसन्स यांचीही सत्यप्रत जसे की शॉप, वाहन परवाना व इत्यादी कागदपत्रे अपलोड करावीत.
- स्थळ पाहणीसाठी दिनांक व वेळ निश्चित करायला हवी.
- स्थळ पाहणी करते वेळी जिल्हा अधिकारी अधिकारी यांना खालील कागदपत्रांची मूळ प्रत द्यावी.
येथे क्लिक करून पहा कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
तरी आवश्यक कागदपत्रे खाली दिली आहेत.
- पात्र लाभार्थ्यांने उत्पन्नाचा दाखला आणावा
- लाभार्थ्याची शपथपत्र असेल हवे
- जमीनदाराची शपथपत्र आणावी लागेल
- निविदा बँकेचे ना देय प्रमाणपत्र आणावे लागेल
- लाभार्थ्याने जिल्हा अधिकारी यांना ऑनलाइन सादर केलेली उर्वरित कागदपत्रे तपासण्यासाठी सादर करावीत.
- जर लाभार्थ्याने ऑनलाईन अर्ज करते वेळी ‘फी’ दिली नसेल तर, ती स्थळ पाहणी करताना जिल्हा अधिकारी किंवा नोडल अधिकारी यांना द्यावी आणि त्याची रीतसर पावती घ्यावी.
- लाभार्थ्याने सादर केलेल्या अर्जाची स्थिती लाभार्थ्याच्या वेबसाइटवर येईल.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
Maratha Karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता :
पात्रता | पात्रता सिद्ध करणारि कागदपत्रे |
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. | लाभार्थ्याला तहसीलदाराने दिलेला अधिवास दाखला. |
लाभार्थ्याचे जिल्ह्यातील वास्तव्य मागील किमान तीन वर्ष असणे आवश्यक. | लाभार्थ्याचे तीन वर्ष वास्तव्य दर्शविणारे कागदपत्र उदा. विजेचे बिल / रेशन कार्ड / ग्रामपंचायत दाखला / आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही. |
लाभार्थ्याचे वय १८ ते ४५ च्या दरम्यान असावे | लाभार्थ्या चा जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही. |
लाभार्थी maharojgar.gov.in या वेब प्रणाली मध्ये नोंदणीकृत असावा. | लाभार्थ्या ने अर्ज online करण्यासाठी maharojgar.gov.in या वेब प्रणाली मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. |
लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. | लाभार्थ्या चे थकबाकीदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र. |
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी रु.५५,००० व ग्रामीण भागासाठी रु.४०,००० च्या आत असावे. | लाभार्थ्याला तहसीलदार यांच्याकडून देण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला. |
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
पात्रते बाबतच्या कागदपत्रांबरोबरच खाली दर्शविण्यात आलेली कागदपत्रेसुद्धा कर्जच्या अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
कर्ज मंजूर झाल्या नंतर काय करावे?
- कर्ज मंजूर झाल्या नंतर महामंडळाच्या नावे आगाऊ धनादेश जमा करावे.
- लाभार्थ्यांनी तारण गहाण करारनामा नोंदणी करून द्यावा.
- लाभार्थी वा जमीनदाराच्या मिळकतीवर बोजा चढवून द्यावा.
- जनरल एग्रीमेंट दीड करून द्यावे.
- लाभार्थ्याने प्रॉमिसरी नोट व मनी रिसिप्ट भरून द्यावी.
- कर्ज रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर परतफेडीच्या कालावधीतील ठरलेल्या त्याप्रमाणे मुद्दल व व्याज या रकमेचा भरणा करावा.
येथे क्लिक करून पहा कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
स्वयंरोजगार या वेबपोर्टल वर इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा कोणत्या?
- विविध प्रवर्गातील उमेदवारांकरीता महामंडळाच्या योजना आहेत.
- उमेदवारास पात्रतेनुसार सुयोग्य स्वयंरोजगार योजनेचा शोध घेणे.
- उमेदवारांना स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे.
- कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता, अटी व शर्ती, कर्ज मंजुर होण्यापूर्वी तसेच, कर्ज मंजुर झाल्यानंतर सादर करावयाच्या कागदपत्रे इत्यादी माहिती उपलब्ध आहे.
- ऑन लाईन सादर केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती तपासणे, कर्ज परतफेडीची सद्यस्थिती पाहणे
- २५० पेक्षा अधिक नमुना प्रकल्प अहवालांची वेबपोर्टलवर उपलब्धता आहे.
- कर्जफेडीच्या हप्त्यांची परिगणना (इएमआय कॅलक्युलेटर) आहे.
- उमेदवारांच्या अडचणी निराकरणासाठी हेल्पलाईन आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!
- 1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
- UMED महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ‘उमेद’ अभियान
- Annasaheb Patil Mahamandal Loan आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ..
- CMEGP scheme राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.