कर्जासाठी अर्ज कसा करावा?
- रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास, नोंदणी करावी लागेल.
- सदर रोजगार नोंदणी क्रमांक पुढील रकान्यात टाकावा.
- आपला प्रोफाईल डेटा दिसेल(प्रोफाईल फोटो नसेल तर अपलोड करा.)
- उपलब्ध असणाऱ्या योजना पाहता येतील.
- निवडलेल्या योजनेला अप्लाय केल्यास संबंधित अर्ज उपलब्ध होईल.
- अर्जा मध्ये माहिती भरून तो पूर्ण करावा त्यानंतर आवश्यक ती कागद पत्रे अपलोड करावीत.
- पूर्ण केलेल्या अर्जानंतर online अथवा offline पद्धतीने अर्ज शुल्क (फॉर्म फी रु. ५०) भरणा करावा.
- Offline पद्धतीने अर्ज सादर केल्यास जिल्हा कार्यालयात फॉर्म फी रु. ५० चा भरणा करावा व शुल्क भरल्याची पावती online अपलोड करावी.
- ज्या तारखेस फॉर्म फी ची भरणा केली जाईल त्या तारखेपासून कर्ज अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.
कर्ज मंजुरीची कार्यपद्धती आणि अर्ज मंजूरीचे टप्पे कोणते?
- अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या https://udyog.mahaswayam.gov.in/#/home या साईट वर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास सिस्टीम द्वारे SMS व email येईल .
- स्थळ पाहणीसाठी लाभार्थी वेबपोर्टलद्वारे दिनांक व वेळ स्वतः निश्चित करेल त्यानुसार संबधीत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालया मार्फत प्रस्तावित व्यवसायाच्या जागेची, वास्तव्याच्या स्थळाची पाहणी तसेच जामीनदाराची पडताळणी करण्यात येईल.
- सादर केलेल्या कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँकेकडे पाठवण्यात येतो.
- बँकेने कर्ज मंजुरी आदेश दिल्यानंतर कर्ज प्रकरणाची फाईल आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून महामंडळाकडे मंजुरीकरिता पाठवण्यात येते.
- महामंडळाकडून कर्ज प्रकरण मंजुरी केल्यानंतर मंजुरी आदेश अर्जदारास सिस्टीम द्वारे (SMS व email) प्राप्त होईल. त्यानंतर अर्जदाराकडून वैधानिक कागदपत्राची पूर्तता करून घेण्यात येईल.
- त्यानंतर महामंडळाकडून बीज भांडवलाच्या रकमेचा धनाकर्ष (डीडी) जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात येतो व त्याची माहिती लाभार्थ्याला सिस्टीम द्वारे (SMS व email) देण्यात येते.
- महामंडळाकडून प्राप्त झालेले बीज भांडवल आणि बँकेने मंजूर केलेली कर्जाची रक्कम एकत्रितपणे अर्जदाराच्या बँक खाती जमा करण्यात येते.
- कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर लाभार्थ्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, ई–मेल वर येईल.
पत्ता :
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
- दूरध्वनी. 22657662,
- फॅक्स क्रमांक.22658017
- ईमेल: apamvmmm@gmail.com
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!
- 1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
- UMED महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ‘उमेद’ अभियान
- Annasaheb Patil Mahamandal Loan आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ..
- CMEGP scheme राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.